साधारणपणे, १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होतो, परंतु यावर्षी, मॉन्सूनला केरळात पोहोचायला जरा जास्तच वेळ लागत आहे. स्कायमेटचा अंदाज आहे की मॉन्सून आता ७ जून रोजी केरळात दाखल होईल. केरळमध्ये आगमनानंतर साधारणपणे सात दिवसांच्या आतच मान्सून महाराष्ट्रात आणि मध्य भारताच्या इतर भागात दाखल होणे अपेक्षित आहे.
स्कायमेटचा अंदाज आहे की महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमानंतरही पावसाची कमतरता जाणवेल ज्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे की पेरणी उशिरा करावी.
मॉनसूनच्या आगमनाला होणारा उशीर लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणीच्या कामकाजास विलंब करण्यास स्कायमेटने सुचविले आहे. मान्सूनच्या आगमनाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उशीर झाला तर सामान्यपणे या कालावधीत पेरणीचे काम पूर्ण होणाऱ्या उडीद आणि मुग या पिकांचे नुकसान होऊ शकते.
केरळात आगमनास विलंब होणार असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हा सोयाबीन, तूर, गहू, मुग, उडीद व कापूस यासारख्या पिकांच्या दृष्टीने प्रमुख हंगाम आहे. यापैकी मुग आणि उडीद या अल्प कालावधीच्या पिकांची शेतकरी सामान्यतः जूनमध्ये पेरणी करून तीन महिन्यांनंतर कापणी करतात. सामान्यतः राज्यात सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी होते. मान्सूनला जर उशीर झाला तर ही दोन्ही पिकं प्रभावित होतील, असे दिसून येत आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे