[Marathi] भारतातील ६५ वर्षातील कोरडा पूर्वमोसमी हंगाम ,२००९ सारखी परिस्थिती

June 4, 2019 5:02 PM | Skymet Weather Team

भारतात पूर्वमोसमी पावसाचा हंगाम ३१ मे रोजी संपुष्टात आला. तीन महिन्यांच्या दीर्घ हंगामात एकूण पावसाची तूट २५ टक्के होती. देशात हंगामातील १३१. ५मिमी सरासरीच्या तुलनेत फक्त ९९ मिमी पावसाची नोंद केली गेली. देशाच्या चार भागात म्हणजेच उत्तरपश्चिम भारत,मध्य भारत,पूर्व व पूर्वोत्तर भारत आणि दक्षिण द्वीपकल्प येथे अनुक्रमे ३०%,१८%,१४% आणि ४७% कमी पावसाची नोंद केली गेली.

गेल्या ६५ वर्षांतील हा दुसऱ्या क्रमांकाचा कोरडा मान्सूनपूर्व हंगाम आहे, याआधी २०१२ मध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून देशातील एकूण पावसाची तूट ३१ टक्क्यांपर्यंत वाढली होती. खरं तर,यावर्षी २००९ च्या पूर्वमोसमी हंगामासारखीच परिस्थिती आहे. त्या वर्षीही पावसाची तूट २५% झाली होती.

दोन वर्षांच्या दरम्यान फक्त हि एकच समानता नाही. दोन वर्षांमधील प्रमुख साम्य म्हणजे हि एल नीनो वर्षे आहेत. अशाप्रकारे, यावर्षी पाऊस काही प्रमाणात २००९ सारख्या प्रतिक्रिया देत आहे.

तथापि, आता मान्सूनच्या हंगामाबद्दल चिंता वाढत आहे. याआधी एल निनोच्या तीव्रतेविषयी बरेच वेळेस सांगितले गेले आहे. तथापि, स्कायमेट पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की एल निनो कमकुवत असो किंवा तीव्र असो त्याची केवळ उपस्थिती मान्सूनला प्रभावित करण्यास सक्षम आहे. २००९ मध्ये सौम्य एल-निनो अनुभवण्यात आला, त्यावेळी निनो ३.४ निर्देशांक ०.५ ते ०.७ दरम्यान होता. तथापि,त्या वर्षी तीव्र दुष्काळ पडला ज्यात पावसाची तूट २२ टक्के होती.

यावर्षी प्रशांत महासागराचे तापमान खूप वाढले आहे आणि निनो ३.४ निर्देशांक ०.७ ते ०.९ पर्यंत पोहोचला आहे. ज्यामुळे मान्सून हंगाम प्रभावित झाला असून जूनच्या सुरुवातीच्या महिन्यात सामान्यपेक्षा २३% कमी पावसाची शक्यता आहे. स्कायमेटने आधीच सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज दिलेला असून या हंगामात ९३ टक्के पाऊस होईल असे सांगितले आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES