आयओडी (हिंद महासागर डायपोल) चा चमत्कारीक प्रवास अखेर संपुष्टात आला आहे, प्रमुख सागरीय मापदंड सामान्य पातळीवर आला आहे. सद्य स्थितीला आयओडी निर्देशांक ०.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला आहे. परंतु मान्सून हंगामातील चांगल्या पावसाबरोबर नेहमीच जोडल्या गेलेल्या आयओडीच्या या प्रवासात भारतीय मान्सूनच्या इतिहासात काही नोंदी आहेत.
पावसाच्या बाबतीत देशासाठी २०१९ हे अपवादात्मक वर्ष ठरले आहे. सर्वप्रथम १९७४ नंतर मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस झाला आणि त्यानंतर मान्सून नंतरचे नऊ चक्रीवादळं भारताच्या इतिहासातील नोंदविलेली सर्वाधिक चक्रीवादळं आहेत.
हंगामाची सुरुवात आशाजनक नव्हती परंतु हंगामची पुढे वाटचाल सुरु असताना चित्र पूर्णपणे बदलले. त्याचे श्रेय आयओडीला जाते, कारण मान्सून २०१९ चा हंगाम सुरुवातीला सामान्यपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तविला जात होता. अगदी अल निनोला ज्याची केवळ उपस्थिती संपूर्ण मॉन्सून हंगाम खराब करण्याची क्षमता ठेवते त्याला देखील निष्प्रभ केला.
खरं तर २०१९ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांत अल निनो निर्देशांक प्रबळ होता, ज्यामुळे मान्सूनपूर्व पर्जन्यमान कमकुवत राहिले, त्यानंतर जून महिन्यात मान्सूनला सुरूवात होण्यास विलंब आणि त्यानंतरच्या महिन्यात दुष्काळासारखी परिस्थिती ज्यात पाऊस केवळ ७७% इतका झाला होता.
आयओडी केवळ धन नव्हता तर इतिहासातील सर्वात प्रबळ होता. यामुळे मान्सूनचा हंगामात चांगलाच म्हणजे ११०% पाऊस झाला.
एप्रिलपासून आयओडी निर्देशांक धन दिशेस सामान्य च्या आसपास होता. तथापि, मे नंतर प्राबल्य वाढून पावसाळ्याच्या हंगामात निर्देशांक धनात्मक झाला. आकडेवारीनुसार, सर्वाधिक काळ म्हणजेच डिसेंबरपर्यंत राहिलेला व आयओडी निर्देशांक ०.४ अंश सेल्सिअसच्या उंबरठा मूल्याच्या वर कायम राहिलेला आहे. याशिवाय आयओडी निर्देशांक २.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता, जी आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे.
हवामानतज्ञांच्या अनुसार, या हंगामात आयओडी निर्देशांकात घट खूपच हळूहळू किंवा उशीरा झाली असेच म्हणायला हवे.
सामान्यत: नैऋत्य मान्सूनच्या परतीनंतर, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन (आयटीसीझेड), जो मुख्यत: मान्सून प्रणालीच्या मंथनासाठी जबाबदार असतो, दक्षिणेकडे दक्षिण गोलार्धाकडे जाऊ लागतो. त्याचबरोबर आयओडीलाही फारसे महत्त्व राहत नाही.
तथापि, यावर्षी अशी कोणतीही क्रिया घडली नाही. सक्रिय आयटीसीझेडसह आयओडीची उपस्थितीने मान्सूननंतरच्या काळात एका पाठोपाठ एक हवामान प्रणाली तयार करण्यासाठी हवामान अनुकूल ठेवले. केवळ समुद्रातील परिस्थिती अनुकूल नव्हती परंतु योग्य प्रमाणात पुरेशी होती ज्यामुळे जास्तीत जास्त प्रणालींनी चक्रीवादळ बनण्यापर्यंत मजल गाठली.
वर्षाकाठी भारतीय समुद्रात नऊ चक्रीवादळ नोंदविण्यात आले असून त्यात सहा समुद्र अरबी समुद्रात तर तीन बंगालच्या उपसागरात बनले आहेत. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची संख्या जास्त आहे.
आयओडी आणि नैऋत्य मान्सून २०२०
आयओडीच्या सद्यस्थितीकडे पाहता हवामान प्रारूपं असे सांगत आहेत की किमान जूनपर्यंत आयओडी निर्देशांक सामान्य राहील.
आता आपण मान्सूनच्या हंगामाकडे प्रगती करीत आहोत, तर पुन्हा सर्वांचे लक्ष आयओडीच्या विकासाकडे असेल. तथापि, हवामानतज्ञांचे मत आहे की, एका पाठोपाठ एक धन तसेच प्रबळ आयओडी इतिहासात आढळत नाही.
तथापि, सगळंच पुस्तकातील नियमांनुसार होत नाही, कोणास ठाऊक आगामी मान्सून २०२० मध्ये आणखी नवीन विक्रम निर्मिले जातील.
Image Credits – DNA India
Any information taken from here should be credited to Skymet Weather