मान्सून चार महिन्यांच्या हंगाम असून मान्सूनचा पाऊस कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वाचा आहे. मान्सून हंगामात काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती असते. तसेच मान्सून दरम्यान पावसाची वेळ आणि स्थानिक वितरण देखील फार महत्वाचे आहे. म्हणूनच,पावसाच्या वितरणावर सर्व लक्ष केंद्रित असते.
मॉन्सूनची सक्रियता आणि खंड हे त्याच्या चक्रातील अविभाज्य घटक आहे. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यांच्या दीर्घ कालावधीत सरासरी (एलपीए) ८८७ मिमी पाऊस होतो. मान्सून हंगामाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १
जून रोजी सुमारे 3 मिमी पाऊस नोंदविला जातो. त्यानंतर या महिन्याच्या शेवटपर्यंत प्रमाण हळूहळू ८ मिमी पर्यंत वाढते. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाचे प्रमाण वाढून प्रतिदिन १० मि.मी. पर्यंत पोहोचते. ऑगस्टच्या मध्यापर्यंत पावसाचे प्रमाण दररोज ९ ते १० मिमी पर्यंत मर्यादित राहते.
त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होऊन ऑगस्टच्या अखेरीपर्यंत ७ मिमीपर्यंत पोहचते व सप्टेंबर मध्यापर्यंत तसेच राहते आणि मान्सून हंगाम प्रतिदिन ४ मिमी एवढ्या प्रमाणावर संपतो. तर, अशा प्रकारे हे मूळतः देशातील पावसाचे संचयी वितरण आहे.
या हंगामात जूनमध्ये पावसाचे प्रमाण ३३% कमी झाले आहे तर जुलै महिन्यात दोन लगतच्या हवामान प्रणालीमुळे पावसाची संतोषजनक नोंद झाली. ६ जुलै ते १२ जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे पावसाची कमतरता ११ जुलै रोजी ३३% वरून १२% पर्यंत येण्यास मदत झाली.
मान्सूनच्या आगमनाला विलंब आणि जूनमधील पावसाच्या उणीवेसोबत पावसाचे वितरण हे देखील शेती क्षेत्रासाठी चिंताचे आणखी एक कारण ठरले.
अशा प्रकारे, आपण असे म्हणू शकतो की रविवारी देशातील एकूण पावसाची कमतरता दीर्घ काळातील सरासरीच्या १२.५% होती, जी जूनमधील ३३% कमतरतेपेक्षा निश्चितच कमी होती. या वर्षीच्या जून मधील पावसाची उणीव गेल्या ४
वर्षातील उच्चांकी ठरली. संथ व अपुऱ्या पावसामुळे पेरणीवर परिणाम देखील झाला.
त्यानंतर मात्र, मान्सून ने विश्रांती घेतल्याने ११जुलै ,१२ जुलै आणि १३ जुलै या लागोपाठ तिन्ही दिवशी ही कमतरता १२% राहिली.
हवामानतज्ञांनुसार, मान्सूनची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे कमतरता वाढत जाऊन १५ % पर्यंत पोहोचेल. बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देखील असे होऊ शकते. आजच्या
तारखेपर्यंत आतापर्यंत दीर्घकालीन सरासरी ८८७ मिमीच्या विरूद्ध हंगामतातील सरासरी ३०० मिलीमीटरपर्यंत पोहोचली आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे