मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून आज पोहोचला. तसेच मान्सूनने संपूर्ण कोकण आणि गोवा, व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आगमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर जोरदार पाउस झाला असून, इतर भागात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस सुरु आहे.
[yuzo_related]
गेल्या २४ तासात हरणे येथे १४३ मिमी. इतका मुसळधार पाउस झालेले असून, कुलाबा येथे ९४ मिमी व सांताक्रूझ येथे ७१ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच डहाणू (६६ मिमी), सोलापूर (६१ मिमी), बीड (६१ मिमी), नाशिक (३९ मिमी), वर्धा (२९ मिमी), यवतमाळ (२६ मिमी) व उदगीर (३६ मिमी) येथे चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
मान्सूनचे आगमन झाले असल्याने येत्या २४ ते ४८ तासात कोकण किनारपट्टीवर व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर चांगला पाउस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र मुंबईसह, कोकण व गोव्यात आणि महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस कमी होईल.
Image Credit: wanderingSoul_photos