यावर्षी मुंबईत मॉनसूनला चांगलाच उशीर झाला आणि कालपर्यंत सुरुवात देखील झाली नव्हती. तथापि, चांगली बातमी अशी आहे की मॉन्सूनचे मुंबईसह गुजरातच्या काही भागांमध्ये आगमन झाले आहे. सामान्यपणे मुंबईत मॉनसून १० जून च्या आसपास येतो पण यावर्षी पाऊस १५ दिवस उशीर दाखल झाला आहे.
चक्रीवादळ वायूचा प्रभाव संपल्यामुळेमुंबईतीलहवामान कोरडे व उष्ण झाले होते. गेल्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात बऱ्याच भागात विखुरलेले पाऊस झाला आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत कुलाबामध्ये ७ मि.मी. पावसाची नोंद झाली तर सांताक्रूझमध्ये १ मि.मी. पावसाची नोंद झाली.
स्कायमेट हवामानतज्ञांच्या मते, मॉन्सूनच्या आगमनासह, पुढील २४ तासांत मुंबईच्या पावसात क्रमिक वाढ दिसून येईल. २६ जून रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अपेक्षा असून २७ आणि २८ जून दरम्यान शहरात एक दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस देखील पडू शकतो.
त्यामुळे २६ ते ३० जून दरम्यान २०० मिमीहून अधिक पाऊसमुंबईत नोंदवला जावू शकतो.तथापि, लोकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणण्यासारखा हा पाऊस एकदम मुसळधार स्वरुपाचा नसेल. तरीसुद्धा, मॉन्सून पावसामुळे सखल भागात पाणी साचून पूर सदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या काळात आकाश ढगाळ राहील, वातावरण आल्हाददायक राहून तापमानात देखील घाट दिसून येईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे