आठवड्याच्या विलंबानंतर दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ चे केरळात ८ जून रोजी आगमन झाले आहे. स्कायमेट हवामान ने सांगितले होते की सर्व आवश्यक निकष शुक्रवारीच पूर्ण झाले होते व चार महिन्याच्या मॉन्सूनच्या हंगामाच्या भारतीय मुख्य भूभागावर येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती.
मॉन्सूनच्या आगमनाचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती जी सध्या दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर बनलेली आहे. ही परिस्थिती येणाऱ्या २४ तासात कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित होईल.
केरळ, लक्षद्वीप द्वीपसमूह आणि तटीय कर्नाटकच्या १४ ठिकाणी ६ जून आणि ७ च्या दरम्यान चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली होती, ज्यामुळे मॉन्सूनच्या आगमनासाठी ६०% निकष आधीच पूर्ण झाले होते. निकषानुसार प्रत्येक भागांवर सतत दोन दिवस २.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात येत होती.
ओएलआर (आउटगोइंग लॉन्गवेव्ह रेडिएशन) अक्षांश ५-१० अंश सेल्सिअस उत्तर आणि रेखांश ७०-७५ अंश सेल्सियस पूर्व या क्षेत्रात २०० वॉट प्रतिवर्ग मीटर थ्रेशोल्ड व्हॅल्यूच्या खाली देखील चालू राहिले. दरम्यान, क्षेत्रामध्ये ३० ते ४० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे. अक्षांश १० अंश सेल्सिअस उत्तर आणि रेखांश ५५-८० अंश सेल्सियस पूर्वच्या अंतरावर असलेल्या क्षेत्रामध्ये ६०० मिलीबार पर्यंत पश्चिमी दिशेने येणाऱ्या वाऱ्यांची खोली देखील दिसून आलेली आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे