आज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तविला असून यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ९५% (यात ५% कमी अधिक होऊ शकते ) पाऊस होण्याची शक्यता आहे. (जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात सरासरी पाऊस ८८७ मिमी इतका असतो).
स्कायमेट या हवामान संस्थेनुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील मान्सूनच्या पावसाची शक्यता पुढीलप्रमाणे
- जास्त पाऊस होण्याची शक्यता ०% (दीर्घकालीन सरासरीच्या ११०% पेक्षाही जास्त )
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता १०% (सरासरीच्या १०५ ते ११०% दरम्यान )
- दीर्घकालीन सरासरीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ५०% असेल.(सरासरीच्या ९६% ते १०४% दरम्यान )
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा थोडासा कमी पाऊस होण्याची शक्यता २५% असेल.( सरासरीच्या ९०% ते ९५ % दरम्यान)
- आणि दुष्काळाची शक्यता १५% असू शकते.( सरासरीच्या ९०% पेक्षा कमी पाऊस )
आता महिन्यानुसार( जून,जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर) हवामानाचा अंदाज बघू या
जून: जून महिन्यात साधारणपणे १०२% सरासरी पाऊस होणे अपेक्षित आहे.(जून महिन्याची सरासरी साधारणतः १६४ मिमि असते.)
- दीर्घकालीन सरासरी च्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ७०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता २०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता १०% आहे
जुलै: जुलै महिन्यात साधारणपणे ९४% सरासरी पाऊस होणे अपेक्षित आहे.(जुलै महिन्याची सरासरी साधारणतः २८९ मिमि असते.)
- दीर्घकालीन सरासरी च्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ६०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता १०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३०% आहे
ऑगस्ट: ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ९३% सरासरी पाऊस होणे अपेक्षित आहे.(ऑगस्ट महिन्याची सरासरी साधारणतः २६१ मिमि असते.)
- दीर्घकालीन सरासरी च्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ६०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता १०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३०% आहे
सप्टेंबर: सप्टेंबर महिन्यात साधारणपणे ९६% सरासरी पाऊस होणे अपेक्षित आहे.(सप्टेंबर महिन्याची सरासरी साधारणतः १७३ मिमि असते.)
- दीर्घकालीन सरासरी च्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ५०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता २०% आहे
- दीर्घकालीन सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३०% आहे