भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविल्यानुसार मुंबईत जोरदार पावसाचा तडाखा सुरूच आहे आणि त्यामुळे सामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार मुंबईत गेल्या २४ तासात २८३ मिमी पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे जून महिन्यात आतापर्यंत सरासरी पाऊस ५३७ मिमी झाला असून नेहमीच्या सरासरी (५२३ मिमी) पेक्षा जास्त आहे.
गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुपारपासून शहरातील वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणत याचा परिणाम झालेला आहे. दादर, हिंदमाता आणि एलफिस्टन रोड या भागात खूप पाणी साठल्याने पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईतील बऱ्याच भागात रस्त्यांवर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे. याचा परिणाम म्हणून कर्मचारी वर्गाला साठलेल्या पाण्याचे रस्ते आणि त्याचबरोबर वाहतुकीची झालेली कोंडी याचा सामना करत आपापल्या कार्यालयापर्यंत पोहचण्याची कसरत करावी लागत आहे.
या जोरदार पावसामुळे तर रेल्वे मार्गावरही भरपूर प्रमाणात पाणी साठल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून लोकल ट्रेन आता फक्त अंधेरी पर्यंतच धाऊ शकत आहे. कल्याण कडून येणाऱ्या तसेच सीएसटीच्या पुढे धावणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे.
तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जोरदार पाऊस असेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान स्कायमेट संस्थेच्या हवामान तज्ञांनी वर्तविल्यानुसार मुंबईत पुढील २४ तास मुसळधार पाऊस सुरूच राहील असा अंदाज आहे. तसेच समुद्र किनाऱ्याला दुपारी २ वाजेच्या आसपास ४.६० मीटर उंचीच्या लाटाही येण्याची शक्यता आहे.
Image courtesy: ibnlive.com