[Marathi] दिल्लीतील प्रदूषण पातळीत सुधारणा, वायव्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा

November 18, 2019 1:38 PM | Skymet Weather Team

दिल्लीकर ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान धोकादायक प्रदूषणाशी झुंजत होते. तथापि, स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिमी विक्षोभ येवून गेल्यानंतर लवकरच वायव्य दिशेकडून वारे वाहू लागले आणि हवेच्या गुणवत्तेस 'गंभीर' वरुन 'निकृष्ट ते अत्यंत निकृष्ट' श्रेणी आणले.

हवेच्या गुणवत्तेत १७ नोव्हेंबरला आणखी सुधारणा दिसून आली, कारण बहुतांश भागातील एक्यूआय ‘मध्यम ते निकृष्ट’ वर्गवारीत नोंदली गेला होता, तर काही फारच ‘अत्यंत निकृष्ट’ वर्गात राहिले.

दिल्ली आणि एनसीआर मधील प्रमुख भागांमध्ये सकाळच्या वेळेस प्रदूषण ‘मध्यम’ श्रेणीत राहिल्यामुळे आज दिल्लीकरांची पहाट स्वच्छ वातावरणात झाली. हे स्पष्टपणे सूचित करते की हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि त्याचे श्रेय वायव्येकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांना जाते.

या वाऱ्यांनी वायू प्रदूषकांना दूर वाहून नेण्यात प्रमुख भूमिका निभावली आहे, हि प्रदूषकं पंजाब आणि हरियाणा लगतच्या राज्यांतून पेंढा जाळण्याच्या धूरातून येत आहे.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, एक्यूआय पुढील काही दिवस दिल्ली आणि एनसीआर क्षेत्राच्या मोठ्या भागासाठी ‘मध्यम’ वर्गात राहील. जोरदार वारे प्रदूषकांना दूर सारत राहतील आणि किमान दोन दिवस जमिनीलगत स्थिर राहू देणार नाहीत.

त्यानंतर, आणखी एक पश्चिमी विक्षोभ २१ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम हिमालयात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा मध्यम वारा वाहण्यास प्रतिबंध होईल. यावेळी आर्द्रतेतही वाढ होईल आणि त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढेल आणि एक्यूआय २१ आणि २२ नोव्हेंबरला 'निकृष्ट ते अत्यंत निकृष्ट' वर्गात राहण्याची शक्यता आहे. तथापि, हि घातक प्रदूषणाची स्थिती अल्पकाळ टिकेल कारण हा पश्चिमी विक्षोभ गतिमान असेल आणि त्यामुळे जास्त काळ वाऱ्यास मज्जाव करू शकणार नाही.

Image Credits – The Weather Channel

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES