[Marathi] येत्या २४ तासांत महाबळेश्वर, मुंबई, नाशिक, पुणे आणि गोंदिया येथे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

September 25, 2019 12:37 PM | Skymet Weather Team

मान्सूनची लाट एकदा पुन्हा सक्रिय झाल्यामुळे येत्या २४ तासांत महाबळेश्वर, मुंबई, नाशिक, पुणे आणि गोंदियामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे मान्सूनच्या पावसाने लक्षणीय वाढ केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामान विभागांमध्ये गेल्या चोवीस तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. विशेषत: पुणे आणि मुंबई येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

स्कायमेटकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून २४ तासांच्या कालावधीत माथेरानमध्ये १०८ मिमी, रत्नागिरी ९९ मिमी, पुणे ८७ मिमी, कोलाबा (मुंबई) ६७ मिमी, कोल्हापूर ६४ मिमी, महाबळेश्वर ५३ मिमी, सातारा ४७ मिमी, हरनाई ३८ मिमी, चंद्रपूर ३१ मिमी आणि अलिबाग ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये चक्रीय परिस्थिती आहे. या प्रणालीपासून एक ट्रफ रेषा दक्षिण गुजरातपर्यंत विस्तारित आहे.

आज विदर्भ, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल.

महाबळेश्वर, मुंबई, नाशिक, पुणे आणि गोंदिया येथे येत्या २४ तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते.

उद्या, पाऊस कमी होईल, पण उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत एक दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरु राहील.

२७ सप्टेंबरपासून पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्‍यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत फक्त एक किंवा दोन मध्यम सरींसह विखुरलेला हलका पाऊस सुरु राहणार. बाकी सर्व ठिकाणी कमी तीव्रतेसह पाऊस पडेल.

उद्या सायंकाळपर्यंत मुंबईत पाऊस कमी होईल. तोपर्यंत, शहर व उपनगरामध्ये एक-दोन तीव्र सरींसह मध्यम पाऊस पडत राहील.  

२८ सप्टेंबरनंतर पावसाळी गतिविधी आणखी कमी होईल आणि केवळ विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतच मर्यादित राहील तर मान्सून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे कमकुवत होऊन जाईल.

Image Credits – Business Standard 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES