[Marathi] गडचिरोलीत ६.२ मिमी पाऊस, येत्या १८ ते २४ तासात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

September 8, 2019 6:10 PM | Skymet Weather Team

विदर्भात गेल्या चोवीस तासात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून गडचिरोलीमध्ये ६.२ मिमी पावसाची नोंद झाली. या सरींनी वातावरण आल्हाददायक बनले असून शहरात ढगाळ वातावरण असून कमाल आणि किमान तापमान पंचविशीत स्थिरावले आहे.

हवामानाविषयी सांगायचे तर कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडच्या उत्तरेकडील भाग आणि त्यालगतच्या प्रदेशावर आहे. ज्यामुळे येत्या १८ ते २४ तासात गडचिरोली आणि आसपासच्या भागात बर्‍याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

त्यानंतर, हि हवामान प्रणाली पश्चिम / वायव्य दिशेने सरकल्यामुळे गडचिरोली आणि त्याच्या आसपासच्या भागात पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय घट होईल आणि केवळ हलक्या सरी सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, बाष्पाची उपलब्धता आणि कमी दाबाच्या क्षेत्राच्या उर्वरित अवशेषांमुळे दिवसाचे तापमान हळूहळू वाढण्यास सुरवात होते आणि सुमारे २८ अंशाच्या आसपास स्थिरावेल.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोलीच नव्हे, तर विदर्भाच्या इतर अनेक भागात चांगल्या पावसाळी गतिविधी सुरू आहे आणि ही प्रणाली अजूनही कायम राहण्याची शक्यता असल्याने मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES