काल सायंकाळी साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान मुंबईत २७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर मुंबईचा पाऊस हलका झाला असून सान्ता क्रूझ वेधशाळेमध्ये केवळ १ मिमी पाऊस पडला.
गेल्या २१ तासांत, पावसाचा जोर कमीच राहिला. तथापि, कल्याण, बोरिवली आणि लगतच्या उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. एक- दोन जोरदार सरींची देखील अपेक्षा आहे. या तीव्र सरींच्या परिणामी सखल भागांत पाणी साचेल व वाहतुकीची कोंडी होण्याची देखील अपेक्षा आहे.
मुंबई पावसाबद्दल येथे पहा:
https://www.skymetweather.com/flood/?state=MH
थेट मेघगर्जनेसह विजेची स्थिती येथे पहा:
https://www.skymetweather.com//lightning-and-thunderstorm-across-india-live-status/
ही परिस्थिती २८ सप्टेंबरच्या सुमारास बदलेल, ज्यामध्ये मुंबईत पाऊस कमी होईल आणि एक दोन ठिकाणी हलक्या पावसासह हवामान जवळजवळ कोरडे होईल.
एकदा मान्सूनच्या सरींनी माघार घेतल्यानंतर तापमान पुन्हा वाढण्यास सुरवात होईल ज्यामुळे हवामान दमट होईल.
Image Credits – Newsmobile
Any information taken from here should be credited to Skymet Weather