गेल्या २४ तासांत मुंबई पावसाचा जोर कायम राहिला असून सांताक्रूझ येथे आज पहाटे ५:३० पर्यंत २१ तासांच्या कालावधीत २५ मिमी पावसाची नोंद झाली.
काल एक-दोन ठिकाणी जोरदार सरींसह शहर आणि उपनगरात मध्यम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात व आसपासच्या परिसरात पाणी साचले होते.
तथापि, स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, काल सायंकाळपासून मुंबईत पाऊस लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे आणि सध्या शहर व उपनगरामध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू आहे.
आता, आम्ही अशी अपेक्षा करतो की पावसाळी गतिविधींमध्ये आणखी घट होईल आणि पुढील २४ तासात शहराच्या काही भागात एक-दोन सरींसह हलका पाऊस पडेल.
प्रामुख्याने पाऊस हलक्या स्वरूपाचा असल्याने सखल भागात पाणी साठण्याची किंवा वाहतुकीची कोंडी होण्याची परिस्थिती उद्भवण्याचा धोका दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिनी मध्ये काही अडथळे येणार नाही.
उद्या, पावसाचा जोर आणखी कमी होईल आणि शहर आणि उपनगरामध्ये तुरळक हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाली की, तापमान पुन्हा वाढण्याच्या मार्गावर येईल, ज्यामुळे हवामान अस्वस्थ आणि दमट होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस हवामानाची हि परिस्थिती कायम राहील.
पावसाळी गतिविधींमध्ये घट होण्याचे श्रेय गुजरातवरील कमकुवत चक्राकार वाऱ्यांना दिले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, किणपट्टीलगतच्या कमी दाबाचा पट्टा कमकुवत झालेला असून पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेगही कमी झाला आहे.
Image Credits – Hindustan Times
Any information taken from here should be credited to Skymet Weather