स्कायमेटने वर्तविलेल्या अचूक अंदाजानुसार, गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात मुसळधार व गुजरात आणि पूर्व राजस्थानात देखील चांगला पाऊस पडला आहे. पावसाच्या तेवीस टक्क्यांच्या अधिशेषासह मध्य भारत पुन्हा एकदा मुख्य लाभार्थी ठरला आहे.
पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ राज्यात जवळपास कोरड्या हवामानाची परिस्थिती अनुभवण्यात आली. परिणामी, उत्तर-पश्चिम भारतात पावसाच्या बाबतीत अजूनही ८% च्या कमतरतेचा धोका आहे. उत्तर-पूर्व भारतात अजूनही सर्वाधिक तूट कायम आहे, सर्वाधिक झळ पोचलेल राज्य मणिपूर असून, त्याखालोखाल नागालँड आणि मेघालय येथे देखील तूट आहे. तथापि, देशव्यापी संचयित पावसाचे ४ टक्के आधिक्य आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत देशात आतापर्यंत सर्वसामान्य ८०७.४ मिमी पावसाच्या तुलनेत ८४१.४ मिमी पाऊस झाला आहे.
२० सप्टेंबरच्या आसपास मान्सून परतीचा प्रवास
या आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. दरम्यान मध्य प्रदेशातून मुसळधार पावसाची पीछेहाट, तर राज्याच्या पूर्वेकडील भागात मान्सून गतिविधी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तथापि कोरड्या असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भागांत विशेषत: आठवड्याच्या उत्तरार्धात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
या आठवड्यात कोकण आणि गोव्यात व्यापक मध्यम-जोरदार सरींची नोंद होईल. दुसरीकडे, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा जोर कमी असेल. तामिळनाडू, रायलासीमा आणि कर्नाटकमध्ये खूप कमी पावसाळी गतिविधी अनुभवल्या जातील. ईशान्य भारतात शक्यतो मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहील मात्र काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आठवड्याच्या शेवटी १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे सखल भागात पाणी साचून स्थानिक पातळीवर पूर सदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मुंबईत देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, विशेषत: आठवड्याच्या उत्तरार्धात एक दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
पश्चिम राजस्थानवर लवकरच प्रतिचक्रवात तयार होण्याची शक्यता असून मान्सूनच्या परतीस सुरुवात होण्यास प्रमुख कारण व सूचक म्हणून कार्य करेल. पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधून २० सप्टेंबरच्या सुमारास एकाच वेळी माघार घेण्याची शक्यता आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये विखुरलेला पाऊस
आठवड्याच्या उत्तरार्धात दिल्लीत अत्यल्प व कमी कालावधीसाठी पाऊस पडेल. आठवड्याच्या उत्तरार्धात राजधानीचे शहर मान्सूनच्या माघारीच्या प्रवासाचे साक्षी होईल.
पिकांवर परिणाम
मध्य प्रदेशात, विशेषत: पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे यापूर्वीच राज्यातील मूग आणि उडीद पिकांचे २० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक आत्तापर्यंत समाधानकारक स्थितीत आहे परंतु येत्या काही दिवसांत अगदी हलक्या पावसाची शक्यता देखील पिकासाठी हानिकारक ठरू शकते. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात मध्यम पावसाची अपेक्षा असून पिकासाठी फायदेशीर ठरेल.
Image Credits – The Hindu Business Line
Any information taken from here should be credited to Skymet Weather