MD Skymet, Jatin Singh:उत्तरेकडील मैदानी भागांवर पावसाळी गतिविधी, पूर्व आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस तर दक्षिण भारतात कोणतीही लक्षणीय हवामान विषयक गतिविधी नाही, दिल्ली-एनसीआर मध्ये गडगडाटासह पाऊस, मुंबईत हलका पाऊस

January 27, 2020 2:30 PM | Skymet Weather Team

मागील आठवड्यात लागोपाठ पश्चिमी विक्षोभ आल्याने उत्तरेकडील डोंगररांगांवर जास्त हिमवृष्टी झाली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडला. तसेच २० आणि २१ तारखेला संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. दक्षिण आणि मध्य भारतात सामान्यतः कोरडे हवामान होते. स्कायमेटने अचूकपणे अंदाज केल्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी हवामानाने कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणला नाही.

उत्तर भारतात पाऊस आणि पूर्व व ईशान्य भारतात पावसाळी गतिविधींमुळे २००५ नंतरचा सर्वाधिक पाऊस असलेला जानेवारी महिना होण्याची शक्यता

आठवड्याची सुरूवात एका पश्चिमी विक्षोभाने होईल ज्यामुळे उत्तर भारतात हवामान विषयक गतिविधी उद्भवतील. उत्तरेकडील डोंगराळ भागांत, विशेषत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २७, २८ आणि २९ रोजी हिमवृष्टी होईल. चक्रवाती अभिसरण प्रेरित झाल्याने तसेच पश्चिमी विक्षोभामुळे हरियाणा, पंजाब, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमधील मैदानी भागांवर गडगटासह पावसाळी गतिविधी होतील. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात घट आणि किमान तापमानात वाढ नोंदविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान २७, २८ आणि २९ रोजी दिल्ली एनसीआरमध्ये गारपिटीसह गडगडाटी पावसाची शक्यता असून २८ तारखेला ह्या गतिविधी जोर धरण्याची शक्यता आहे.

बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये २८, २९ आणि ३० रोजी गडगडाटासह विखुरलेला पाऊस पडेल. त्यानंतर गतिविधी ईशान्य दिशेकडे सरकतील आणि ३० व ३१ रोजी संपूर्ण ईशान्येकडील प्रदेश व्यापतील. त्यानंतर मात्र १ आणि २ फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि अप्पर आसामपुरता पाऊस मर्यादित राहील.

सौराष्ट्र आणि कच्छ मधील काही भागांत २७ तारखेला तुरळक पाऊस पडेल, त्यानंतर २८ तारखेला दक्षिण गुजरातच्या काही भागात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होईल आणि अहमदाबाद, गांधीनगर आणि वडोदरासारख्या ठिकाणी त्याचा परिणाम होईल. छत्तीसगड आणि ओडिशा येथे २८ आणि २९ तारखेला काही अवकाळी गतिविधींची अपेक्षा आहे, तर विदर्भ आणि मध्य प्रदेश मध्ये देखील १ आणि २ रोजी अवकाळी गतिविधींची शक्यता आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे २८ रोजी हलक्या पावसाची नोंद होईल. मुंबईतील किमान तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते.

भारतीय द्वीपकल्पात या आठवड्यात कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामानविषयक गतिविधींचा अनुभव येणार नाही. तेलंगाणा व आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील भागांमध्ये २८ व २९ तारखेला विखुरलेला व हलका पाऊस पडेल. पश्चिम किनारपट्टीवर तापमानात वाढ होईल. चेन्नईत सामान्यत: हवामान कोरडे असेल.

आतापर्यंत, जानेवारीत आधीच सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात २७ ते २९ या कालावधीत पावसाळी गतिविधी अपेक्षित असून देशाच्या पूर्वेकडील भागात देखील अवकाळी गतिविधींमुळे २००५ नंतरचा सर्वाधिक पाऊस असलेला जानेवारी महिना होण्याची शक्यता.

Image Credits – Daily Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES