मागील आठवड्यात झालेल्या पावसाचा मध्य भारत मुख्य लाभार्थी राहिला असून पावसाचे २४ टक्के आधिक्य राहिले. या मान्सून हंगामात मध्य प्रदेशात पुराचा सामना करावा लागला असून मागील आठवड्यात राज्याच्या पश्चिम भागात विक्रमी ५५% पाऊस झाला.
स्कायमेट उपलब्ध हवामानाच्या आकडेवारीनुसार १ जून ते २२ सप्टेंबरपर्यंत देशात आतापर्यंत सामान्य ८४४ मिमीच्या तुलनेत ८८२.९ मिमी पाऊस नोंदला गेला. देशात एकंदरीत ५% पावसाचे आधिक्य राहिले असेल तरी सर्वच विभागात चांगली परिस्थिती आहे असे नाही. पावसाच्या बाबतीत उत्तर-पूर्व भारतात सर्वाधिक तूट आहे. दुष्काळग्रस्त राज्य मणिपूर असून इथे पावसाची तूट ६० टक्के आहे.
मान्सूनच्या परतीस सुरुवात सामान्यत: सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून होते. परंतु हे वर्ष अलिकडच्या काळात मान्सूनच्या परतीच्या प्रवासास सर्वाधिक विलंब झालेले म्हणून नमूद होईल. किनारपट्टीच्या दोन्ही बाजूला मान्सून प्रणालींची उपस्थिती मान्सूनच्या परतीस उशीर होण्यामागील प्राथमिक कारण असल्याचे मानले जाते.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरातमध्ये मध्यम तर कोकण आणि गोवा येथे हलका पाऊस पडेल. त्यानंतर ही प्रणाली ओमानच्या दिशेने जाईल. आठवड्याच्या पूर्वार्धात बंगालच्या उपसागरात एक मान्सून प्रणाली तयार होईल व हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण द्वीपकल्पाकडे सरकेल ज्यामुळे आठवड्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटकमध्ये पावसाची अपेक्षा आहे. केरळवासियांना या आठवड्यात काही तीव्र सरींचा अनुभव येईल. या भागांतील पावसाचा जोर लवकरच कमी होईल आणि त्यानंतर मध्य व पूर्व भारतावर केंद्रित होईल.
उत्तर भारतामध्ये अल्प कालावधीसाठी विखुरलेला पाऊस पडेल. उत्तर भारतातील सर्वाधिक तूट असलेल्या हरियाणामध्ये पावसाच्या अभावामध्ये तूटीमध्ये आणखी वाढ नोंदविण्यात येईल. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दिल्ली एनसीआर मध्ये सकाळ व संध्याकाळ आल्हाददायक असतील. दुपार थोडी उबदार राहील आणि अत्यल्प काळासाठी विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व भागात पावसामुळे बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये पावसाच्या कमतरतेत सुधारणेस वाव आहे. तसेच सक्रिय मान्सूनमुळे एकत्रित देशव्यापी अधिशेषातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. हा आठवडा आपल्याला हंगामाच्या समाप्तीच्या जवळ घेऊन जाईल.
मुसळधार पावसाने झोडपलेल्या मुंबईकरांना दिलासा नाही
या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या पावसाने सप्टेंबरच्या पावसाचा दहा वर्षांचा विक्रम मोडला होता. गेल्या आठवड्यात, पावसाने हा आकडा पार करून १९५४ सालचा विक्रम मोडला. २२ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, मुंबईत सप्टेंबरमध्ये ३४१.४ मिमी सामान्य पावसाच्या तुलनेत यंदा १०६७.४ मिमी पाऊस झाला आहे. या आठवड्यातही पावसाळी गतिविधी कमी होण्याची अपेक्षा नसून पावसाचा जोर वाढून आठवड्याच्या उत्तरार्धात सर्वत्र पसरण्याची अपेक्षा आहे. दरम्यान शहरात येत्या २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पिकांवर परिणाम
गुजरातमध्ये या टप्प्यावर मध्यम पाऊस पिकासाठी हानिकारक ठरेल. भुईमुगाचे पीक पक्व अवस्थेत आहे आणि अतिवृष्टीमुळे यापूर्वीच पिकाचे नुकसान झाले आहे. या टप्प्यावर मध्यम पाऊस पडल्यास कापूस पिकाचेही नुकसान होऊ शकते. लवकर पेरलेले पीक बॉल ओपनिंगच्या टप्प्यावर आहे आणि आता पाऊस झाल्यास कापसाची गुणवत्ता खालावण्याची शक्यता अधिक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकमध्ये पाऊस पिकासाठी चांगला राहील. तथापि, जर मुसळधार पाऊस पडला तर त्याचा पिकावर दुष्परिणाम होईल. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता भातासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
Image Credits – The Hindu Business Line
Any information taken from here should be credited to Skymet Weather