२५ जुलैपासून सलग चार आठवडे पडणाऱ्या अतिरिक्त पावसामुळे मान्सूनच्या आगमनास झालेला उशीर तसेच जून आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात असलेली पावसाची कमतरता भरून निघाली. जुलै महिन्याच्या अखेरीस देशभरात पावसाची तूट ९% होती मात्र जोरदार पावसामुळे २५ ऑगस्टपर्यंत पावसाचे आधिक्य १% झाले.
स्कायमेटकडे १ जून ते २५ ऑगस्ट या काळातील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत सामान्य ६६७. ७ मिमीच्या तुलनेत ६७२. ४ मिमी पाऊस पडला आहे. मध्य भारत पावसाचे १२% आधिक्य लाभ मिळालेला मुख्य लाभार्थी ठरला आहे. दक्षिण द्वीपकल्पातही या सक्रिय मॉन्सूनमुळे ७% पावसाचे आधिक्य आहे. उत्तर पश्चिम भारतात ५% तूट आहे. पूर्व आणि ईशान्य भारत ही सगळ्यात कमी पाऊस झालेला असून येथे पावसाची कमतरता १६% आहे. या आठवड्यात पावसाळी गतिविधी लक्षणीयरित्या कमकुवत होतील आणि हवामानाच्या कोणत्याही तीव्र गतिविधींची शक्यता नाही.
मान्सून ची तीव्रता कमी होणार
गेल्या चार आठवड्यात सतत पाऊस पडला होता मात्र या आठवड्यात असे होणार नसून देशभरात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. बंगालच्या उपसागरात सलग दोन हवामान प्रणाली तयार होणार असून त्या मध्य भारत ओलांडून पश्चिम भारताच्या काही भागात पोहचतील. म्हणून, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यासारख्या देशाच्या मध्यवर्ती राज्यांत सक्रिय मान्सून मात्र कमी तीव्रतेसह कायम राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात गुजरात आणि राजस्थानमध्ये काही चांगल्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिण द्वीपकल्पात पावसाळी गतिविधी कमी राहतील. जवळपास दुष्काळ पडलेल्या चेन्नईमध्ये गेल्या काही आठवड्यात जोरदार पाऊस झाला तेथेही हलका पाऊस पडेल किंवा पाऊस पडणार देखील नाही.
गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरलेल्या पश्चिम घाटात हलका ते मध्यम पाऊस पडेल. जवळजवळ कोरडे वातावरण असलेल्या मुंबईत गेल्या पंधरवड्यापासून एक अंकीसुद्धा पावसाची नोंद झाली नाही. तसेच उत्तर-पूर्व भारतात देखील मुसळधार पाऊस पडणार नाही.
दिल्ली एनसीआरमध्ये विखुरलेला पाऊस
दिल्ली एनसीआर मध्ये आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत अल्प कालावधीत काही प्रमाणात पाऊस पडेल. मागील आठवड्यात दिल्लीत जारी करण्यात आलेल्या पूर सतर्कतेच्या इशारा उत्तरेकडील पर्वतीय क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम होता.
पिकांवर परिणाम
या काळात हलक्या सरींचा पाऊस पिकांसाठी लाभदायी ठरेल. बहुतेक पिके फळ तयार होण्याच्या टप्प्यावर असल्याने हलक्या पावसामुळे उत्पन्न चांगले मिळेल. या टप्प्यावर जर मुसळधार पाऊस सुरू राहिला तर फुले गळून पडल्याने नुकसान होईल, आणि उत्पन्न कमी होईल.
Image Credits – The Economist
Any information taken from here should be credited to Skymet Weather