गेल्या दहा दिवसांत मान्सूनने पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतातील बरेच भाग व्यापले असून बहुतांश भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद केली जात आहे. मान्सूनच्या उत्तर सीमेत २० ते २५ जून या ६ दिवसांच्या दरम्यान सतत केलेली प्रगती यावरून हे स्पष्ट होते. स्कायमेटद्वारे आधीच वर्तवल्यानुसार हा कालावधी जून महिन्यातील सर्वोत्तम काळ म्हणून ओळखला जाऊ शकतो.
साधारण तीन दिवस खोळंबलेली मान्सूनची प्रगती २८ जून रोजी पुन्हा सुरु झाली. मान्सूनची उत्तर सीमा सध्या द्वारका, अहमदाबाद, भोपाळ, जबलपूर, पेंद्र, सुल्तानपूर, लखीमपूर खेरी आणि मुक्तिश्वरमार्गे जात आहे.
जूनमध्ये खराब पाऊस झाल्यामुळे देशातील एकूण पावसाची कमतरता ३३ टक्के आहे. जर आपण विभागवार कमतरता पाहिली तर देशातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील तूट ३७% आहे. उत्तर-पश्चिम भारत ३२% च्या तुटीसह दुसरा, त्यानंतर मध्य भारत ३१% आणि दक्षिण द्वीपकल्पात ३० टक्के तूट आहे. खाली दर्शविलेल्या चित्रात लाल, आणि पिवळा रंग असलेल्या जिल्ह्यात मोठ्या पावसाची कमतरता आहे.
जूनमध्ये कमकुवत मान्सूनमुळे कमी पाऊस झाल्यामुळे देशभरातील जलाशयांमध्ये देखील त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा आहे. सुमारे ९१ मोठ्या जलाशयांपैकी ८६ त्यांच्या दीर्घकालीन सरासरी क्षमतेच्या ४०% पेक्षा कमी आहेत. दक्षिण भारतातील देशातील अधिकतम क्षमता असलेल्या सुमारे ३१ जलाशयांपैकी ३० त्यांच्या दीर्घकालीन सरासरी क्षमतेच्या ४०% पेक्षा कमी आहेत. पश्चिम आणि पूर्व भारतातील जलाशय देखील जास्त ताणाखाली आहेत. खालील सारणी तुम्हाला देशभरातील जलाशयाची संपूर्ण माहिती देईल.
जुलैमध्ये चांगल्या पावसाचा पंधरवाडा
दरम्यान, ३० जून ते १५ जुलै दरम्यान मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून त्यादरम्यान थोडी विश्रांती देखील घेण्याची अपेक्षा आहे. बंगालच्या खाडीत बनणारे कमी-दाबाचे क्षेत्र हे या मागील कारण असेल. ओडिशा, उत्तर किनारी आंध्रप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, तेलंगाणाचा उत्तर भाग, दक्षिण मध्यप्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, दक्षिणपश्चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण राजस्थान आणि गुजरात या भागांना जास्त फायदा होण्याची अपेक्षा आहे.
मध्य भारतावरील चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, शेतक-यांना सूचित केले जाते की पेरणी न झाल्यास पेरणी करावी. मध्यम व अतिवृष्टी पावसाची आशंका लक्षात घेता शेतात पाणी साचण्यापासून बचावासाठी शेतामध्ये योग्य निचरा राखणे आवश्यक आहे ज्यामुळे स्थायी पिकांचे नुकसान होऊ शकते. या काळात कीड व तणनाशकांवर नियंत्रण ठेवण्यास केलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी ठरतील. विशेषतः भात, सोयाबीन आणि डाळी यांसारख्या पिकांमध्ये कीटक किंवा रोगांच्या बाबतीत काळजी घेण्याचा हा काळ असेल.
मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज
३ ते ५ जुलै दरम्यान मुंबईत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. या काळात २०० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता असून त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जून महिन्या शेवटी चांगला पाऊस झाल्यानंतरही जुलै महिना देखील मुंबईसाठी अत्यंत आशाजनक दिसत आहे.
याउलट चेन्नईत बऱ्याच काळापासून चांगला पाऊस झालेला नाही. शहरातील बहुतेक जलाशयात त्यांच्या दीर्घकालीन सरासरी क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात पावसाची कमी शक्यता असल्यामुळे परिस्थिती बिकट होण्याची आशंका आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे