[Marathi] दिल्लीत मागील पाच वर्षातील सर्वात जास्त पाऊस

July 12, 2015 3:29 PM | Skymet Weather Team

गेल्या सहा दिवसांपासून दिल्ली आणि एनसीआर येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे या भागात गेल्या ५ वर्षांतील जुलै मधील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. आज सकाळी ८.३० पर्यंत गेल्या चोवीस तासात दिल्लीला ६९ मिमी पावसाची नोंद झाली.

आत्तापर्यंत पालम येथे चक्क २८७.१ मिमी पाऊसाची नोंद झाली. यामुळे तेथील मासिक सरासरी (२१५ मिमी) सुद्धा ओलांडली गेली आहे. सफदरजंग येथे सुद्धा २०८.५ मिमी पावसाची नोंद झाली जी मासिक सरासरीच्या (२१४ मिमी) खुप जवळ आहे.

गेले काही दिवस सुरु असलेल्या संततधारेमुळे दिल्ली व जवळपासच्या भागातील तापमानात सुद्धा खुप घट झाली आहे. काल शनिवारी नोंदलेगेलेले कमाल तापमान २६.५ अंश से. इतके होते, हे १९६९ पासूनचे सर्वात कमी तापमान होते. यालाच जोड म्हणून किमान तापमान देखील सरासरीच्या ४ अंश खाली म्हणजेच २३ अंश से. ला स्थिरावले होते.

भारतातील स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागानुसार, मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आंदोलन, पश्चिमी विक्षोभ व उत्तर प्रदेशाच्या वायव्येला असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे दिल्लीला एवढा मुसळधार पाऊस झाला.

सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार मान्सूनची हि स्थिती दिल्ली आणि लगतच्या भागावर अजून २४ तास अशीच रहाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चोवीस तास दिल्ली व परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. या नंतर आत्ता असलेल्या प्रणालिंपैकी तीव्र स्वरूपाचे कमी दाबाचे क्षेत्र क्षिण होईल व मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याशी जाईल याची परिणीती पावसाच्या प्रमाणात खुप घट होण्यात होईल.

आतापर्यंत झालेल्या पावसाने दिल्लीतील जनजीवन जवळजवळ ठ्ठप्प झाले होते. आत्तापर्यंतच्या वृत्तानुसार एका माणसाला पावसामुळे आपला जीव गमवावा लागला असून आठ जणांना दुखापत झाली आहे. रस्त्यांचे रुपांतर नाल्यात झाल्यामुळे वाहतुक पूर्णपणे कोलमडलेली आहे.

मागील चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे.

Image Credit: thehindu.com

OTHER LATEST STORIES