Skymet weather

मराठवाडा हवामान : गारपीट, वादळी वारे आणि पावसामुळे बीड, परभणी, जालना येथे पिकांचे नुकसान

February 12, 2018 4:34 PM |

Rain in Maharashtra post

स्काय मेट च्या पूर्व अंदाजानुसार, महाराष्ट्रातील  बऱ्याच भागांत  मागील २४ तासांत विजेच्या गडगडाटासह  मोठ्या पावसाची नोंद झाली. काही  ठिकाणी प्रचंड प्रमाणात  वादळी वाऱ्यासह  गारपीट झाली ज्यामुळे  विदर्भ  आणि मराठवाड्यातील   रब्बी पिके , फळबाग  आणि  भाजीपाल्याचे नुकसान झाल्याची  माहिती  मिळते आहे.

[yuzo_related]

मराठवाड्यातील  बीड,उस्मानाबाद, औरंगाबाद,लातूर, जालना, परभणी, नांदेड  आणि हिंगोली येथे  पिकांचे  नुकसान झाले आहे. परभणी, जालना  आणि  बीड  येथे नुकसानीची तीव्रता जास्त आहे.

काल  झालेलया अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पश्चिम  विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांचे  नुकसान झाले असून,   प्राथमिक  माहिती  नुसार, गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा, डाळिंब, पपई, कांदा  आणि भाजीपाला  ह्या पिकांचे  प्रचंड नुकसान  झाले आहे.

Maharashtra

Click the image above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra

येत्या  २४ तासांत अजून पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज  असून,रब्बी पिके , फळबागा आणि  भाजीपाला  पिकांना  होणारा  धोका टळलेला  नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी  त्यांच्या  पिकांची शक्य असेल तेवढी  काळजी घ्यावी.

सध्याची  वातावरणाची स्थिती  निवळून, कोरडे आणि थंड  वारे उत्तर  आणि  दक्षिण  दिशेकडून वाहतील. त्यामुळे  दिवस आणि रात्रीचे तापमान सुद्धा  थंड आणि आल्हाददायक  राहील.

बंगालचा  उपसागर आणि  अरबी समुद्रावरून येणारे  दमट वारे मराठवाडा आणि विदर्भातील भागांवर येऊन मिसळल्यामुळे  गारपीट झाल्याचे  हवामान तज्ञाचे मत आहे.  वादळी वारे आणि प्रचंड प्रमाणात झालेली  गारपीट हे पीक  नुकसानीस  कारणीभूत आहेत. काही ठिकाणी  गारपीट अर्ध्या तासांपर्यंत  चालू होती  ज्यामुळे नुकसानीची  तीव्रता वाढली. जवळपास ३ ठिकाणी जीवितहानी झाल्याचे  वृत्त  आहे.

Image Credit: holidify.com

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try