उत्तर आंध्र प्रदेशावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम मराठवाड्यापर्यंत झाल्यामुळे सध्या येथे चांगलाच पाऊस सुरु आहे. स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील बऱ्याच शहरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे, हिंगोली येथे ४८ मिमी, जालना आणि उस्मानाबाद येथे अनुक्रमे ५७ मिमी आणि ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच नांदेड आणि परभणी येथे अनुक्रमे १७ मिमी आणि १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच स्कायमेट या संस्थेच्या माहितीनुसार मराठवाड्या लगतच्या विदर्भातही काही भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ येथे मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत अमरावती आणि वर्धा येथे अनुक्रमे ३३ मिमी आणि २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला मराठवाड्यात चांगल्या पावसाने चांगलीच हजेरी लावली होती आणि त्यामुळे तेथे समाधानकारक पाऊस झाला होता परंतु जुलै महिन्यात मात्र एकदमच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे या भागात ११ ऑगस्ट पर्यंत ५२% पावसाची तुट निर्माण झाली.
याच बरोबर विदर्भात अगदीच विरुद्ध परीस्थिती आहे जून महिन्यात चांगला पाऊस झाला आणि पावसाची सरासरी पार करून ती नेहमीपेक्षा ५२ % जास्त होती. आणि त्यामुळे जुलै महिन्यात जरी विदर्भात पाऊस कमी झाला तरी आतापर्यंतची सरासरी समाधान कारक आहे.
तसेच मराठवाड्यात अजूनही २४ तास चांगला पाऊस होईल आणि विदर्भात सुरु असलेला पाऊस अजून दोन दिवस तरी असाच सुरु राहील.
Image Credit: livemint.com