Skymet weather

[Marathi] पाणी विशेषज्ञांनुसार मराठवाडा मरूभूमी होण्याच्या वाटेवर

May 24, 2019 9:01 AM |

Drought-in-Maharashtra-3-1-952x500

महाराष्ट्रातील असलेल्या पाण्याच्या गंभीर परिस्थितीचे अनेक अर्थशास्त्रज्ञ आणि मराठवाड्याची मरुभूमी होण्याचा इशारा देणाऱ्या व्यक्तींच्या अनुसार मुख्य कारण उपयुक्त योजना राबवण्यात आलेले अपयश आहे.

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आणि अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक एच. एम. देसार्डा यांच्यामते धोरणकर्त्यांची विफलता आणि सत्ताधारी लोकांच्या स्वार्थीपणामुळे मराठावाड्यातील शेतकऱ्यांना अशी पिके घेण्यास मजबूर केले जी सध्याच्या हवामानास पूरक नाही. खरं तर, जलस्रोतांच्या गैरव्यवस्थापनासाठी सरकार जबाबदार आहे. शिवाय, मराठवाड्यात अविरत पाण्याचा उपसा झाल्याने भूगर्भीय पाण्याची पातळी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Also read in English: Marathwada in Maharashtra on the verge of desertification, say water experts

आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ७६ पैकी ५० च्या आसपास तालुक्यांमध्ये गेल्या वर्षी ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याचा अर्थ प्रति हेक्टरमध्ये ३ दशलक्ष लीटर पाणी जे मराठवाड्यातील ३०० प्रति चौरस किलोमीटर मधील सरासरी लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. प्रत्यक्षात, उरलेला पाणीसाठा किमान एक पीक घेण्यास पुरेसा आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ७६ पैकी ७० तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीत लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. त्यापैकी २५ तालुक्यांमध्ये तर भूजल पातळी दोन मीटरने खालावली आहे.

कृषी-हवामान वैशिष्ट्ये

प्रा. देसार्डा म्हणतात कि गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील पिकाची पद्धत मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. 'आधी, अन्नधान्य आणि तेलबिया ही मुख्य लागवड असलेली पिके होती. तथापि, सध्या क्षेत्रातील ५० लाख हेक्टर्सच्या लागवडीयोग्य जमिनीच्या ८०% पेक्षा अधिक भागात सोयाबीन आणि बीटी कॉटन हि प्रमुख पिकं आहेत, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी ४% जमिनीत ऊस पीक आहे , जे ८०% जलसाठा वापरते.

औरंगाबाद स्थित पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेमधील माजी सहाय्यक प्राध्यापक प्रदीप पुरंदरे म्हणाले, मराठवाड्यामध्ये वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे व त्यास मज्जाव करण्यासाठी ऊस लागवडीस प्रतिबंध करणे हा एकमेव उपाय आहे.

राजकीय परिस्थिती

'राजकीय पीक' म्हणून ऊस ओळखला जातो, मतदारांना कायम ठेवण्यासाठी एक प्रभावी पद्धत, जी अनेक राजकीय अभिजात वापरतात. राज्यातील २०० पैकी ५० साखर कारखाने मराठवाड्यात आहेत, असे प्रा. देसार्डा म्हणतात. पुरंदरे यांनी स्पष्ट केले की, सतत वाढत असलेल्या पाण्याच्या संकटात देखील ४० पेक्षा जास्त ऊस कारखाने चालू आहेत.

यावर्षी जानेवारीत लातूरमधील बऱ्याच भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परिस्थिती इतकी वाईट झाली कि १२ दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी एक प्रमुख स्त्रोत असलेल्या मांजरा धरणातून पाणी उपसा टाळून इतर ठिकाणावरून पाणी घेण्यात आले.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try