नैऋत्य मान्सून चा पाऊस उत्तर भारतात जोरात सुरु असताना महाराष्ट्रातील काही भागात मात्र अगदीच कमी पाऊस झाला आहे. एकतर मान्सूनची उशिरा लागलेली हजेरी त्यातून पदरानं अपुरा पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा हे सध्या महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याचे वर्णन करण्याचे विशेषण असल्यासारखेच आहे. या दोन भागातील होणाऱ्या पावसाच्या तुटवड्यामुळे खरीप पिकांची लागवड करण्यासही शेतकऱ्यांना उशीर होतो आहे. या भागातील पावसाची होणारी तुट काही वेळेस ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. दुष्काळ सदृश परिस्थितीचे कारण खराब मान्सूनचा सहज परिणाम होणारे दोन भाग म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ. या भागातील जनजीवन हे बऱ्यापैकी हे शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळेच तेथील होणारा पाऊस आणि तापमानाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या आयुष्यावर होताना दिसतो. या सगळ्या परिणामांचा सम्बंध थेट या भागांच्या भौगोलिक स्थितीशी आहे. कारण हा भाग महाराष्ट्राच्या अगदीच आतील बाजूस आहे आणि या मुळे मान्सूनचा पाऊस लातूर, परभणी आणि नांदेड या भागापर्यंत पोहचेपर्यंत अगदीच विरळ होतो. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे मुख्य कारण या भागाची भौगोलिक स्थितीच आहे. आणि त्याचबरोबर या भागातील अयोग्य पाणीपुरवठा योजना आणि सिंचन पद्धतीचा अभाव याही दोन बाबींमुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरात जी हवामान प्रणाली निर्माण होते त्याचा परिणाम मध्य भारतावर अगदी विदर्भापर्यंत होत असतो. विदर्भाला मध्य प्रदेशचा शेजारी असल्याचा नक्कीच फायदा होतो आणि त्यामुळे या भागात नैऋत्य मान्सूनचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असतो. दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात जी मान्सूनची प्रणाली तयार होते त्याचा पूर्ण प्रभाव हा कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पुणे, नाशिक या भागात जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळेच मराठवाड्यात अपुरा पाऊस होतो. हा भाग विदर्भ आणि उरलेल्या महाराष्ट्राच्या कात्रीत अडकल्या सारखा असतो. Image Credit : TOI