महाराष्ट्र राज्याला सध्या उष्णतेपासून बरीचशी सुटका मिळाली आहे ,याचे महत्वाचे कारण म्हणजे झालेला पूर्व मौसमी पाऊस हे आहे.
पूर्व मौसमी पाऊस खुप ठिकाणी चांगला बरसला आहे त्यामुळं हवेत थंडावा निर्माण झाला आहे. काल दक्षिण मध्य महाराष्ट ,दक्षिण कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील काही ठिकाणी पाऊस पडला. रविवारी सकाळी ८. ३० पासुन २४ तासांत रत्नागिरीमध्ये ३२ मिमी पावसाची नोंद झाली, तर अमरावती २६ मिमी, परभणी १६ मिमी, सोलापूर १५ मिमी, अहमदनगर १४ मिमी, पुणे १०. ८ मिमी, चंद्रपूर १० मिमी, वेंगुर्ला ९ मिमी, महाबळेश्वर ४ मिमी, नागपूर २ मि.मी., आणि सांगली येथे ४ मिमी दुसरीकडे, मुंबईमध्ये थोडाही पाऊस झाला नाही.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. या प्रदेशातील तापमान २ ते ३ अंशांनी कमी होऊन हवामान आरामदायक होईल.
[yuzo_related]
याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सुद्धा काही भागात ५ जून आणि ६ ला तुरळक पाऊस होऊ शकतो . पावसाची तीव्रता आता वाढत जाणार आहे ,मध्य महाराष्ट्र व कोकण येथे मौसमी पावसाची सुरवात याच दिवशी होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई आणि जवळच्या भागात पावसाची सुरवात ८ जुन ला होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र कृषी पट्टयांवर हवामानाचा होणार परीणाम पाहू;
विदर्भातील शेतकरी मित्रांनी तांदूळ पिकाची काढणी पूर्ण करून घ्यावी ,व काढलेली पिके सुरक्षित पने ठेवावी. जमिनीची खोल नांगरणी करून ठेवावी. मराठवाडा मधील शेतकरी मित्रांनी वांगी, मिरची, टोमॅटो यांची लागवडी करण्यास सुरवात करावी. मध्य महाराष्ट्र मधील शेतकरी बंधूनी बाजरी, सोयाबीन अशा पीक पेरणीची तयारी करावी.
Image Credit: Quora.com
ये थून घेतलेल्याकोणत्याहीमाहितीचे श्रेय skymetweather.com लाद्यावे.