[Marathi] मुंबई, रत्नागिरी, डहाणू आणि सिंधुदुर्गमध्ये या आठवड्याच्या शेवटी पाऊस

May 20, 2019 4:39 PM | Skymet Weather Team

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पूर्व मान्सूनच्या हंगामात सुरुवातीपासूनच पावसाची कमतरता राहिली आहे. स्कायमेटकडे उपलब्ध आकडेवारीनुसार १ मार्च ते १९ मे दरम्यान विभागानुसार, कोकण आणि गोवा मध्ये ९४% तूट आहे, त्यानंतर विदर्भात ७४%, मध्य-महाराष्ट्रात ६९% आणि मराठवाड्यात ६७% पावसाची तूट आहे.

या सर्व चार विभागापैकी, विदर्भ हा एकमात्र विभाग आहे जिथे तीन महिन्यांत पावसाचा लपंडाव व गडगडाटी परिस्थिती अनुभवली गेली. तथापि, पाऊस फक्त थोड्या काळासाठीच व जोर देखील कमीच होता.

Also read in English: Rain in Mumbai, Ratnagiri, Dahanu and Sindhudurg likely around weekend

दुसरीकडे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

विदर्भातील कमी पावसाचे प्रमुख कारण म्हणजे पूर्वेकडून पूर्व मध्य प्रदेश, विदर्भासह तेलंगाणातुन जाणारी व दक्षिण प्रायद्वीपपर्यंत विस्तारलेली ट्रफ रेषा असू शकते.

सध्या एक ट्रफ रेषा दक्षिण छत्तीसगडपासून तेलंगाणातून तामिळनाडू पर्यंत विस्तारत आहे, परंतु, महाराष्ट्रावर यामुळे कोणतीही हवामान विषयक गतिविधी अपेक्षित नाही. तथापि, २५ किंवा २६ मे रोजी महाराष्ट्राच्या किनारी भागावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून यामुळे डहाणू, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

पावसाळी गतिविधी मुळे कोकण आणि गोव्यातील तापमान कमी होण्यासाठी मदत होईल. तथापि, राज्यातील उर्वरित भागात तापमान सामान्य राहील. दरम्यान, राज्यात बहुतेक भागात उत्तर पश्चिमेकडून येणारे कोरडे आणि गरम वारे वाहतील, आणि विदर्भावर उष्णतेची लाट कायम राहील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES