सध्या महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये मोठ्या पावसाची कमतरता आहेत. मान्सून पूर्व पावसाचा हंगाम महाराष्टामध्ये जवळजवळ कोरडा राहिला आहे. तथापि, एप्रिलच्या मध्यंतरामध्ये आणि मेच्या सुरुवातीच्या काळात विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या तुरळक सरी अनुभवण्यात आल्या.
कमकुवत मान्सून पूर्व पावसामुळे जमिनीतील आर्द्रता खूप कमी राहिली असून त्यामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे.
Also read in English: Scorching heat to rule Vidarbha, Marathwada, Madhya Maharashtra for next week, no relief soon
पावसाची कमतरता खूप आहे. सध्या कोकण आणि गोवा प्रामुख्याने कोरडे असून पावसाची तूट ९७ टक्के आहे. तसेच मराठवाड्यामध्ये ७८ टक्के, विदर्भामधे ७६ टक्के आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ७६ टक्के पावसाची तूट आहे.
स्कायमेट हवामान तंज्ञानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अजून एक आठवड्यापर्यंत पावसाची कोणतीही शक्यता नाही. तथापि, राज्याच्या किनारी जिल्ह्यांमध्ये डहाणू ते गोवा या भागांमध्ये प्रामुख्याने मुंबई ,रत्नागिरी,रायगड या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आहे. हा पाऊस अत्यंत कमी असून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात फारसा फरक पडण्याची शक्यता नाही. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये कमीतकमी एक आठवडाभर तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थितीची शक्यता आहे.
विदर्भातील चंद्रपूर मध्ये परवा हंगामातील सर्वाधिक ४७. ८ अंश तापमान नोंदले गेले जे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातही सर्वाधिक होते.
त्याचप्रमाणे नागपूरमध्येही ४७.५ अंश तापमान नोंदले गेले आहे, अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अत्यंत तीव्र व असह्य उष्णतेची परिस्थिती आहे. मान्सूनपूूर्व पावसाळी गतिविधींच्या अभावामुळे अजून एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी तापमानात दिलासा नाही. याचे मुख्य कारण सांगायचे तर वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तान कडून राजस्थान मार्गे महाराष्ट्रापर्यन्त येणारे उष्ण आणि कोरडे वारे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे