Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रासाठी पुढील आठवडा उष्ण आणि गर्मीचा

May 13, 2019 4:29 PM |

Maharashtra Drought

महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची कमतरता आहेत. सध्या मध्य-महाराष्ट्रात ६०%, मराठवाडा ६१%, विदर्भ ७२% तर कोकण आणि गोवा विभागात ८९% पावसाची तूट आहे.

दरम्यान, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील पूर्व-मॉन्सून पावसाळी गतिविधी वगळता, कोकण आणि गोवा जवळपास कोरडेच राहिले आहेत. मुंबई शहर आणि लगतच्या परिसरात देखील मागील एक महिन्याहून जास्त काळात पाऊस झालेला नाही. तसेच विदर्भातील बऱ्याच भागात उष्णतेची लाट होती. तथापि, १० मे पासून, तापमान काही प्रमाणात कमी झाले आहे ज्यामुळे बऱ्याच भागातून उष्णतेची लाट कमी झाली. पण अद्याप अमरावती आणि नागपूरमध्ये अनुक्रमे ४३.४ आणि ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे जे सामान्यपेक्षा जास्तच आहे.

तथापि, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूरसारख्या ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट असून तापमान अनुक्रमे ४५.६ आणि ४५ अंश सेल्सिअस नोंदले आहे. तज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात कोणतीही हवामान गतिविधी नसल्याने राज्याची उष्ण आणि गरम हवामानाच्या परिस्थितीतून तूर्तास सुटका होणार नाही. दरम्यान किनारपट्टीवर असल्यामुळे कोकण आणि गोवा येथील तापमान ३० अंशाचा आसपास आहे.

Also read in English: After a short break post tomorrow, rain in hills of North India likely again on May 16

तज्ज्ञांच्या अनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींची रेलचेल वाढेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try