[Marathi] मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथे आज अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता

December 24, 2019 6:09 PM | Skymet Weather Team

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कोरडे हवामान अनुभवण्यात येत आहे. तथापि, पावसाळी गतिविधी पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता असून ह्या परिस्थितीत बदल होणार असे दिसत आहे.

हवामान प्रारूपांच्या अनुसार, दोन हवामान प्रणाली आहेत, ज्यामुळे राज्यात विखुरलेला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. अवकाळी पावसाने यापूर्वी देखील राज्यात जोरदार हजेरी लावली होती.

हवामान प्रणालींबद्दल सांगायचे तर लक्षद्वीप क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही विभिन्न वाऱ्यांचे संगम क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, रत्नागिरी, डहाणू, नागपूर, नाशिक, अकोला, मालेगाव आणि अमरावती या शहरांमध्ये आज पासून २६ डिसेंबरदरम्यान पाऊस हजेरी लावण्याची अपेक्षा आहे.

शिवाय, आज संध्याकाळपासून विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होण्याची शक्‍यता असून या भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत हिंगोली, लातूर, नांदेड, जालना आणि बीड या शहरांमध्येही तुरळक पावसाची नोंद होऊ शकते. अहमदनगर, औरंगाबाद आणि महाबळेश्वर येथे विखुरलेला पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून राज्यात काही भागात गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पावसामुळे, येत्या काही दिवस किमान तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, पाऊस कमी झाल्यावर उत्तर / ईशान्येकडून वारे वाहू लागल्याने रात्रीच्या तापमानात पुन्हा घट होईल.

Image Credits – The Hindu

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES