गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. राज्यातील सर्वच भागात अगदी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस झाला.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेच्या हवामान विभागानुसार मध्य महाराष्ट्रावर आणि त्यालगतच्या पश्चिम मध्य प्रदेशावर जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.
सध्या हि हवामान प्रणाली उत्तर मध्य महाराष्ट्रावरून पुढे पश्चिम-वायव्य दिशेला सरकत आहे. ह्या हवामान प्रणालीमुळे मुंबईसह कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात येत्या २४ ते ४८ तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल.
तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात या पावसाची तीव्रता हळूहळू कमी होऊन तेथे काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
त्यानंतर या हवामान प्रणालीची क्षमता कमी होऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आणि मध्य महाराष्ट्रात अजून दोन दिवस तुरळक पाऊस होईल.
गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात राज्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
Image Credit: adlertours.files.wordpress.com