Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रात मान्सूनचा जोरदार पाऊस सुरू, पुढेही असाच सुरु राहणार

September 18, 2015 3:06 PM |

Maharashtra receives heavy rain, more showers expectedगेल्या २४ तासांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. राज्यातील सर्वच भागात अगदी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस झाला.

भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेच्या हवामान विभागानुसार मध्य महाराष्ट्रावर आणि त्यालगतच्या पश्चिम मध्य प्रदेशावर जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.

सध्या हि हवामान प्रणाली उत्तर मध्य महाराष्ट्रावरून पुढे पश्चिम-वायव्य दिशेला सरकत आहे. ह्या हवामान प्रणालीमुळे मुंबईसह कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात येत्या २४ ते ४८ तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल.

तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात या पावसाची तीव्रता हळूहळू कमी होऊन तेथे काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.

त्यानंतर या हवामान प्रणालीची क्षमता कमी होऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आणि मध्य महाराष्ट्रात अजून दोन दिवस तुरळक पाऊस होईल.

गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात राज्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे

Table--Rain in Maharashtra

Image Credit: adlertours.files.wordpress.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try