Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रातील मान्सूनच्या पावसाची स्थिती थोडी ठीक झाली

August 6, 2015 5:02 PM |

Rain in Marathwadaगुजरात, महाराष्ट्र, आणि नैऋत्य दिशेकडील मध्यप्रदेश (इंदोर आणि लागतचा भाग) यंदा या तिन्ही भागात जुलै महिन्यात खूप पावसाची गरज होती. या भागात पावसाच्या दीर्घकालीन विश्रांतीमुळे कोरडेपणा निर्माण झाला होता हा कोरडेपणा जुलैच्या शेवटी कमी झाला. गुजरातमध्ये तर इतका पाऊस झाला कि तेथे पूरस्थिती निर्माण झाली.

जुलै महिन्याच्या अखेरीस मराठवाड्यात ५५% कमी झाला होता तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनुक्रमे २५%, १७% कमी पाऊस झाला होता.५ ऑगस्टला महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असून विदर्भात २४ तासात ८१.९ मिमी पाऊस झाला असून दैनंदिन सरासरीच्या(१०.९ मिमी) पेक्षा जास्त नोंद झालेली आहे. तसेच मराठवाडा आणि मध्यम्हाराष्ट्रात गेल्या २४ तासात अनुक्रमे २०.३ आणि १३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात  दैनंदिन सरासरी ४.४ मिमी असते आणि मध्य महाराष्ट्राचीही दैनंदिन सरासरी ७.५ मिमी असते.

यामुळेच या भागातील पावसाची तुट भरू निघाली असून सध्या विदर्भात ८% पावसाची तुट निर्माण झाली आहे. तसेच मराठवाड्याचेही झाले असून तेथेही ५३% पावसाची तुट निर्माण झाली आहे. आणि मध्य महाराष्ट्रात २८% कमी पाऊस झाला.

ज्या हवामान प्रणालीमुळे हा पाऊस झाला त्या हवामान प्रणालीचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून सध्या हि प्रणाली मध्य प्रदेश आणि लगतच्या उत्तरप्रदेशावर स्थित आहे. तरीही अजूनही महाराष्ट्रात भरपूर पाऊस देण्याची या प्रणालीत इतकी क्षमता नक्कीच आहे.

rain in Maharashtra

महाराष्ट्रातील कृषिक्षेत्र

महाराष्ट्रातील पिके खासकरून मराठवाड्यातील पिके आता वाढू लागली आहेत. गेले २५ दिवस खूपच कोरडे वातावरण होते परंतु या पावसाच्या सरींमुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण आता ज्या पिकांची लागवड झाली आहे त्या पिकांसाठी खूपच चांगली बाब आहे. तसेच नवीन  पेरणीसाठीही पूरक वातावरण आहे.

image credit - Indiaspend.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try