आता महाराष्ट्रातील बहुतांश भाग पाऊस न पडल्यामुळे कोरडे झाले आहेत. किंबहुना, गेल्या काही दिवस राज्यातील काही भागांत हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
या मध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ यांचा समावेश आहे तर, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोंकण हे विभाग मुख्यतः कोरडे होते.रविवारी सकाळी ०८:३० पासून गेल्या २४ तासात, मुंबईतील सान्ता क्रूज़ वेधशाळा ३ मिमी पाऊस, गोंदिया ५ मिमी, महाबळेश्वर ०. ५ मि.मी. सातारा ०. २ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सर्व विभागांच्या पावसाच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे.२९ जुलै ला कोकण येथे सामान्य पावसापेक्षा १६ % अधिक पाऊस झाला आहे , विदर्भ २७ % अधिक , मध्य महाराष्ट्रात १५% अतिरिक्त पावसाची नोंद झाली तर मराठवाडा येथे आता पाऊस सामान्य पेक्षा 4% कमी झाला आहे .
[yuzo_related]
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस मर्यदित स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. किमान पुढील दोन तीन दिवस जवळजवळ संपूर्ण राज्यात पावसामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ अपेक्षित नाही.
तथापि, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र मधील काही भागात हलकासा पाऊस होऊ शकतो . दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा मधे हवामान कोरडे राहू शकते .
हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू ;
कोकण मधील शेतकरी मित्रांनी तांदूळ,नाचणी अश्या पिकांना खत फवारणी करावी तर इतर फळ पिकांना (आंबा, काजू, नारळ, सुपारी) शेण खत घालावे. मराठवाड्यामधील व विदर्भ मधील शेतकरी बंधूनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावेत . पीक कीड होऊ नये म्हणून कीटकनाशकांची सुद्धा फवारणी करून घ्यावी .
Image Credit: YouTube
येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे.