Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रातील ५१००० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २१ कोटींची मदत

May 21, 2019 3:45 PM |

drought in Maharashtra

नुकत्याच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील ५१००० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २१.०९ कोटी रुपयांची मदत देण्यात आली.

जिल्हाधिकारी प्रशांत नरवारे यांच्या म्हणण्यानुसार, 'गेल्या वर्षी पुरेशा मान्सून च्या अभावामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये क्षमतेपेक्षा फक्त २२%पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

त्यामुळे गरज लक्षात घेता जिल्ह्यातील पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी भरपाई च्या रुपात २१. ०९ कोटी रुपये दिले गेले, असेही त्यांनी सांगितले.

Also read in English: Maharashtra gets drought assistance worth Rs 21 cr for its 51,000 farmers

आतापर्यंत पालघरमधील ३३३ गावांमधील ५१,१७४ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.

जिल्हाधिकारी प्रशांत नरवारे यांनी पुढे सांगितले की, आठवड्या च्या अखेरीस राज्य आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनीही जिल्ह्यात भेट दिली. त्यांनी पाणी कमतरतेच्या परिस्थितीचे पुनरावलोकन केले आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी निधीची कमतरता नाही असे म्हटले.

त्याआधी, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार ला २,१६० कोटी रुपयांचा निधी दिला होता ,त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती मध्ये राष्ट्रीय आपत्तीतून महाराष्ट्राला निधी देण्याबद्दल पंतप्रधान मोदी यांची कृतज्ञता व्यक्त केली होती.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try