पुण्यात गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने अलीकडे पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत काही भागांत तीव्र पावसाळी गतिविधींची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याच ठिकाणी गडगडाटासह चांगला पाऊस अनुभवला गेला.
या पावसाचे श्रेय मध्य-पूर्व अरबी समुद्रावर महाराष्टाच्या किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाच्या क्षेत्राला जाते.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वरील प्रणाली उत्तर / ईशान्य दिशेने जाईल आणि नंतर कमकुवत होईल. ही प्रणाली हळूहळू महाराष्टाच्या किनाऱ्यापासून दूर सरकेल आणि वायव्य दिशेने ओमानकडे जाण्याची अपेक्षा असली, तरी पुण्यात आणखी दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शहर आणि आसपासच्या भागात येत्या २४ ते ४८ तासांत गडगडाट व एक किंवा दोन तीव्र सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीतील कामकाजात काही अडचण येऊ शकतात.
मात्र, पावसाच्या इशाऱ्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची आधीच व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान केंद्रे जलरोधक केली गेली आहेत.
दरम्यान याकाळात हवामान ढगाळ असेल आणि वातावरण आल्हाददायक राहील.
साधारणपणे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस ओसरत असतो. तथापि, सध्याचा पाऊस याला अपवाद असून पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील बर्याच भागांमध्ये मान्सून हंगामानंतरच्या पावसाने हजेरी लावली आहे.
Image Credits – Business Standards
Any information taken from here should be credited to Skymet Weather