१४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोंकणात, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. राहिलेल्या भागांत हवामान कोरडे आणि गरम राहील.
१६, १7 आणि १८ तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस वाढेल. कोंकण, दक्षिण आणि मध्य मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
१९ ऑक्टोबर रोजी, मध्य महाराष्ट्रात, दक्षिण कोंकणात मध्यम से जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
२० तारखे पर्येंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील भागांत पाऊस कमी होईल तर दक्षिण आणि मध्य मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस सुरु राहील. दुसरीकडे, कोंकण आणि गोआ आणि दक्षिण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की शेतातून जास्त पाणी काढून टाकावे आणि कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमीन तयार करण्यास प्रारंभ करा. कापूस व मका पिकेत आळ्या लागल्या आहेत ज्यामुळे नियमितपणे देखरेख करा आणि कीटकांची लोकसंख्या ईटीएल पातळी ओलांडल्यास नियंत्रण उपाययोजना करा. लवकर पेरलेल्या बाजरी व सोयाबीन पिकाची कापणी करा.
उसा, टोमॅटो पीक आणि भाजीपाला जोरदार वाऱ्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी संरक्षण करा. रब्बी, ज्वारी, हरभरा, आणि भाजीपाला पिके यांची जमीन तयार करणे चालू ठेवा.
Image Credits – Herald Publicist
Any information taken from here should be credited to Skymet Weather