[Marathi] महाराष्ट्र आणि कामगार दिवस

May 1, 2019 5:05 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्र दिवस, हा महाराष्ट्र राज्याच्या निर्माण दिवस म्हणून साजरा केला जातो. या राज्याची स्थापना १ मे १९६० मध्ये झालेली होती. या शिवाय, हा दिवस आंतराष्ट्रीय स्तरावर कामगार दिवस म्हणून हि जाणवला जातो.

१९५० मध्ये, संयुक्त महाराष्ट्र म्हणून एक आंदोलन सुरु झाला, ज्याचे मुख्य कारण स्वतंत्र मराठी बोलणारे राज्य सुरू करणे होते, या उलट, महागुजरात आंदोलनाचा लक्ष्य गुजराती भाषेची स्थापन करणे होती. १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यासह निषेध आणि संघर्ष संपला. परिणामस्वरूप, भारतीय संसदेने दोन वेगळे वेगळे राज्यांची स्थापना केली, जेथे महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाली, व गुजरातची गांधीनगर.

हे पण वाचा : [Marathi] बुधवार रोजी महाराष्ट्रात 10 सर्वात गरम ठिकाण

१ मे १९६० रोजी हा कायदा लागू झाला. भाषेची ही विभागणी झाल्यानंतर महाराष्ट्राने अशा क्षेत्रांचा समावेश केला ज्यात मराठी व कोंकणी भाषा बोलणारे होते व गुजरात राज्याने गुजराती आणि कच्छी बोलणारे लोकांचा समावेश केला.

महाराष्ट्र दिवस कसा साजरा केला जातो?

तेव्हापासून 1 मे रोजी दरवर्षी महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. सरकारी कार्यालयांसाठी, बैंक, स्टॉक मार्केट्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात सुट्टी असते व राज्यातील माणसं एक वेगळ्यास उत्साहाने हा दिवस साजरा करतात.

महाराष्ट्र दिवसावर तुमच्या करता घेऊन येत आहोत, हवामान संबंधित मराठी भाषित बातम्या, आमच्या नवीन Skymet Marathi पेज वर. हवामान संबंधित बातम्या आता तुमच्या पसंदीदा मराठीत भाषेत. आमच्या नवीन पेज Skymet Marathi ला like करणे विसरू नका.

प्रतिमा क्रेडीट: मुंबई लाईव

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES