Skymet weather

[Marathi] महा मुळे आज मुंबईत हलका पाऊस, २०१० नंतर सर्वाधिक पावसाची नोंद झालेला नोव्हेंबर महिना

November 7, 2019 2:06 PM |

Mumbai weather today

मुंबई पावसाने यंदा नेहमीचा कल दाखविला नाही. प्रत्येक वेळी, ऑक्टोबरच्या मध्यभागानंतर पाऊस गायब होतो व क्वचित अचानक हलक्या सरी पडतात. तथापि, या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस झाला. सांताक्रूझ वेधशाळेने नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ "महा" मुळे ४६ मिमी पावसाची नोंद केली.

आज मुंबई शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ महा जे कमकुवत झाले आहे व ती आणखी कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्टयात रूपांतरित होण्याची अपेक्षा आहे. आता मुंबई शहर चक्रीवादळापासून सुरक्षित अंतरावर आहे. तथापि, एक कमकुवत प्रणाली असली तरी त्याच्या परिघांत असल्यामुळे आज शहरात थोडा पाऊस होण्याची अपेक्षा आहे. दिवस अंशतः ते पूर्णतः ढगाळ असण्याचीही अपेक्षा आहे. पहाटेच्या वेळेस शहरात हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईत नोव्हेंबरच्या पावसाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईत सरासरी ९.९ मिमी पाऊस पडतो, परंतु शहरात यापूर्वीच ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा २०१० नंतर चा जास्त पाऊस असलेला नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये मुंबईत ४७.२ मिमी पाऊस झाला होता. हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने २०१० चा विक्रम मोडला जाऊ शकतो.

 Image Credits – Zee Business 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try