अरबी समुद्रावरील चक्रीवादळ "महा" मागील सहा तासांत १० किमी प्रतितास वेगाने पूर्वेकडे जात आहे. आजपर्यंत, म्हणजे ७ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यपूर्व व लगतच्या पूर्वोत्तर अरबी समुद्रावर अक्षांश १९.८ अंश उत्तर आणि रेखांश ६८.९ अंश पूर्वेला आहे, पोरबंदरच्या सुमारे २२० किमी दक्षिण-नैऋत्य दिशेस, वेरावळच्या १९० किमी नैऋत्येकडे आणि दीवपासून पश्चिम-नैऋत्य दिशेस २३० किमी. अंतरावर आहे. चक्रीवादळ पूर्व-ईशान्य दिशेने जाण्याची शक्यता आहे, पुढील १२ तासांच्या दरम्यान ईशान्येकडील आणि पूर्वोत्तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा म्हणून कमकुवत होईल. चक्रीवादळ पूर्व-ईशान्य दिशेने वाटचाल सुरू ठेवत असतांना उद्या संध्याकाळपर्यंत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.
गुजरातच्या दक्षिणेकडील किनाऱ्यासाठी ही प्रणाली धोकादायक आहे याची खात्री आहे पण आता हे स्पष्ट झाले आहे की ही प्रणाली गुजरातच्या भूभागावर धडकणार नाही. ही प्रणाली गुजरातच्या दक्षिणेस ईशान्य अरबी समुद्रामध्ये कमकुवत होत जाईल. म्हणूनच, गुजरातमध्ये जास्त हवामान विषयक गतिविधींची अपेक्षा नाही. पोरबंदर, वेरावळ, गिर सोमनाथ, अमरेली, सूरत, वलसाड, भावनगर येथे मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नसली तरीसुद्धा, काही भागात काही जोरदार सरी होवू शकतात. वाऱ्याचा वेग अंदाजे ४०-५० किमीपर्यंत असेल तर काही भागात ७० किमी प्रतितास वेगाचे वारेही अनुभवले जावू शकतात.
अशाप्रकारे, गुजरातमध्ये कोणत्याही संभाव्य हानीची शक्यता नाकारली गेली आहे. तरीसुद्धा, समुद्राजवळ कुठलीही अप्रिय घटना घडण्यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त खबरदारी घ्यायला हवी. झाडाच्या फांद्या मोडणे आणि तारा तुटण्याच्या किरकोळ घटना अपेक्षित आहे. समुद्र उग्र ते अगदी खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात येत आहे.
Image Credits – The Indian Express
Any information taken from here should be credited to Skymet Weather