Skymet weather

[Marathi] मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी

October 26, 2015 5:09 PM |

rain in thaneस्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक पाऊस झालेला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे आग्नेय वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणजे या भागात होणारा पाऊस आहे.

रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात नाशिक येथील मोहाडी येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली तसेच ठाण्यातील गोरेगाव येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आंबेडकर नगर मधील घारगाव येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सर्वसाधारणपणे वर्षाच्या या दिवसात पाऊस येण्याची शक्यता फारच कमी असते. नैऋत्य मान्सूनचे आगमन जर उशिरा झाले असेल तर कधी कधी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस होतो.

परंतु यावेळेस मध्य पाकिस्तान आणि त्यालगतच्या राजस्थानवर चक्रवाती अभिसरणचे क्षेत्र तयार झाले आहे. आणि या क्षेत्राचा परिणाम दक्षिण पाकिस्तान आणि लगतचा गुजरात तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र यावर नैऋत्य वाऱ्याच्या स्वरुपात होतो आहे.

येत्या २४ ते ४८ तास अशी परिस्थिती राहील असा अंदाज आहे. तसेच या काळात ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव आणि अहमदनगर येथे पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातच्या लगतच्या भागात तसेच नैऋत्य मध्य प्रदेशात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

या पावसाची तीव्रता जरी कमी असली तरी या पावसामुळे जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाणात वाढ झाली असून हे रब्बी पिकांसाठी फायद्याचे आहे.
Image Credit: Indianexpress






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try