या वर्षी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस खूपच कमी झाला. या काळात मध्य महाराष्ट्रात ३३% कमी पाऊस झाला तर मराठवाड्यात ४०% आणि कोकणात ३०% कमी पाऊस झाला. त्या मानाने विदर्भात बरा पाऊस झाला (-११%). हवामानाच्या दृष्टीने विदर्भात सर्वसामान्य पाऊस झाला असे म्हणता येईल.
ऑक्टोबर मध्ये मात्र मध्य महाराष्ट्रात व कोकण किनारपट्टीला चांगला पाऊस झाला. परंतु महाराष्ट्रातील इतर दोन भागात म्हणजेच विदर्भ व मराठवाड्यात कमी पाऊस झाला. सर्वसामन्यपणे ऑक्टोबर मध्ये पाऊस तसा कमीच होत असतो.
सुरवातीला लक्षद्वीप जवळ असलेली अरबी समुद्रातील हवामान प्रणाली उत्तरेकडे सरकून ती कर्नाटकच्या किनारपट्टी जवळ गेल्याने मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला.
मागील १३ दिवसात मध्य महाराष्ट्रात -६% तर विदर्भात -९७% आणि मराठवाड्यात -५४% पाऊस झाला आहे. या उलट कोकण किनारपट्टीला मात्र १०% अधिक पाऊस झाला आहे.
उदाहरणार्थ, पुण्याला (मध्य महाराष्ट्रात) ऑक्टोबर मध्ये सर्वसामान्यपणे ७७.९ मिमी पाऊस होतो आणि आत्तापर्यंत तिथे ६७ मिमी पाऊस झाला आहे. या महिन्यात आत्तापर्यंत सोलापुरात देखील ७६ मिमी इतका पाऊस झाला असून तिथली सरासरी ८९.५ मिमी आहे.
याच्या नेमकी उलटी परिस्थिती विदर्भात आहे. नागपूरला अजिबात पाऊस झाला नाही जेथे ऑक्टोबर ची मासिक सरासरी ७७ मिमी आहे. अकोल्याला ५ मिमी पौसाची नोंद झाली आहे तेथील मासिक सरासरी ४७ मिमी आहे.
याच बरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात होत असलेला पाऊस हळूहळू कमी होत असल्याने तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे.
Image Credit: dnaindia.com