Skymet weather

[Marathi] बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता, मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक

June 17, 2019 3:52 PM |

Monsoon in India

आगमनानंतर मॉन्सूनची प्रगती मंद राहिली आहे. साधारणत: ५ जूनपर्यंत मान्सून पूर्वोत्तर भारतात पोहोचतो, परंतु प्रत्यक्षात मॉन्सूनने काल यातील बहुतेक भाग व्यापले. तसेच भारतीय द्वीपकल्पावर मान्सून आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार खूप मागे आहे.

मॉन्सूनच्या प्रवासात बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या प्रणाली उपयुक्त असतात. मान्सून प्रणाली अरबी समुद्रामध्ये देखील बनतात, परंतु त्यांच्या पासून बहुतेक वेळेस नुकसानच होते. या प्रणालींच्या प्रभावामुळे पाऊस होतो परंतु जेव्हा ह्या प्रणाली भारतीय उपखंडापासून दूर जातात तेव्हा पावसाची तूट देखील उद्भवते.

दरम्यान २० जूनच्या आसपास बंगालच्या उत्तरपश्चिमी खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा विकसित होण्याची शक्यता आहे. पण हि प्रणाली कमकुवत राहणार असून तिच्या प्रभावामुळे मध्य भारतासह छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत बंगालच्या उत्तरपश्चिम खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचा जोर वाढून ओडिसाच्या किनापट्टीजवळ १९ जून रोजी एक चक्रवाती प्रणालीत रूपांतरित होईल. ह्या प्रणालीचा कार्यकाळ जास्त नसेल आणि अंशतः जमीन व समुद्रावर राहणार आहे. जमिनीवर आल्यानंतर, ओडिसा आणि आंध्रप्रदेशच्या आसपासच्या भागावर ह्या प्रणालीच्या प्रभावामुळे चांगला पाऊस पडेल. तसेच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्ये आणि तेलंगाणा व कर्नाटकमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य आणि भारतीय द्वीपकल्पावर मान्सूनच्या प्रगतीस हि यंत्रणा महत्त्वाची ठरेल. तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात देखील आणखी एक प्रणाली खाडीत तयार होवू शकते.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try