[Marathi] कमी दाबाचा पट्टा पुढील १० दिवस मान्सून २०१९ ला सक्रिय ठेवेल

July 28, 2019 5:04 PM | Skymet Weather Team

मान्सून २०१९ सक्रिय स्थितीत असून त्यामुळे देशाच्या मध्य आणि पश्चिमी भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मान्सूनच्या विश्रांतीमुळे झालेली पावसाची कमतरता जी २७ जुलै रोजी १९ टक्के होती ती १३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

चांगली बातमी अशी आहे की ही मान्सूनची लाट आणखी १० दिवस सक्रिय स्थितीत राहील. स्कायमेटनुसार कमी दाबाच्या क्षेत्रांची मालिका आगामी दिवसात मान्सूनला सक्रिय ठेवतील.

२६ जुलै रोजी बंगालच्या उत्तर खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो पश्चिम बंगालमधून अंतर्गत भागांत सरकला आहे. हिमालयाच्या पायथ्यालगत असलेली ट्रफ रेषा खाली येण्यास देखील हि प्रणाली कारणीभूत आहे. तथापि, ही प्रणाली आता कमकुवत झाली असून मान्सून ट्रफ रेषेत विलीन झाली आहे.

दरम्यान, बंगालच्या उत्तर खाडीमध्ये अजून एक चक्रवाती प्रणाली विकसित झाली आहे. ३०-३१ जुलैपर्यंत हि प्रणाली अधिक सक्रिय होऊन या भागांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हवामानतद्यांनुसार हि प्रणाली परत अंतर्गत भागात सरकेल आणि आधीच्या प्रणाली प्रमाणे कार्यान्वित राहील. हि प्रणाली देशाच्या मध्य भागात पोचताच ती उत्तरेकडे वायव्य भारताच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरवात करेल.

अशा प्रकारे, पूर्वीच्या प्रणालीप्रमाणेच, संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या उत्तर भागात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा येथे पाऊस पडेल. ट्रफ रेषा नेहमीच्या ठिकाणाच्या दक्षिण दिशेकडे आहे नंतर उत्तरेकडे वळेल. परिणामी, ३० किंवा ३१ जुलैच्या सुमारास दिल्लीसह देशाच्या उत्तर पश्चिमी भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि मध्य भागांत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहील. या प्रणालीमुळे पश्चिम किनारपट्टीवरील ट्रफ रेषा सक्रिय झाल्यामुळे कर्नाटकचा किनारी भाग तसेच मुंबईसह कोकण आणि गोवा येथे चांगला पाऊस होईल.

एवढेच नाही तर ४ ऑगस्ट च्या सुमारास बंगालच्या उत्तर खाडीमध्ये अजून एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास हवामानाची स्थिती अनुकूल आहे. हि प्रणालीसुद्धा आधीच्या प्रणाली प्रमाणे कार्यान्वित राहील ज्यामुळे देशभर मॉन्सून सक्रिय राहील.

अशा प्रकारे जुलैप्रमाणेच ऑगस्ट महिन्याची सुरुवात देखील जोरदार पावसाने होईल असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

प्रतिमा क्रेडीट:अजकेंटरल॰कॉम

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES