जुलैच्या सुरुवातीपासून, दोन मान्सून प्रणाली तयार झाल्या असून त्यापैकी दुसरी प्रणाली जास्त सक्रिय आणि जास्त काळ सक्रिय राहिल्याने जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस पडला. या चांगल्या पावसामुळे ३३ टक्क्यांवर असलेली पावसाची तूट १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
साधारणपणे मान्सून हंगामात, बंगालच्या खाडीमध्ये कमीत कमी दोन प्रणाली तयार होणे सामान्य असते किंबहुना असायलाच हव्यात ज्यामुळे बऱ्याच भागांत चांगला पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कमीतकमी तीन प्रणाली तयार होतात किंवा कधीकधी त्यापेक्षा जास्त प्रणाली सुद्धा तयार होतात.
सध्या, बंगालच्या खाडीमध्ये प्रणालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. खरं तर बंगालच्या उत्तर खाडीवर आधीच एक कमकुवत ट्रफ रेषा असून अजून एक प्रभावी ट्रफ रेषा कधीही तयार होऊ शकते.
पुढील ४८ तासांत ओडिसा आणि आंध्र किनारपट्टीलगत असलेलया बंगालच्या उत्तर खाडीवर चक्रवाती प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २४ तासांत, हि प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरीत होईल. ही प्रणाली किनाऱ्याकडे सरकेल, आणि अंशतः जमिनीवर आणि अंशतः समुद्रात असेल.
नंतरच्या २४ तासांत म्हणजेच १९ आणि २० जुलैच्या आसपास ही प्रणाली छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओडिसा आणि विदर्भातील काही भाग प्रभावित होतील. या प्रणालीमुळे भारताच्या दक्षिणी द्वीपकल्पावर पाऊस पडेल, जिथे अजूनपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. अशाप्रकारे, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता आहे.
शिवाय, पश्चिमी किनारी भागांत जिथे अजून पाऊस झाला नाही अशा ठिकाणी थोडयाफार पावसाची शक्यता असून केरळमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक असेल. ही प्रणाली आधीच्या प्रणाली एवढी प्रभावी नसेल. तसेच, या प्रणालीचा प्रभाव फार दूरपर्यंत नसून केवळ पूर्व आणि मध्य भागांमध्येच राहील. याशिवाय याच काळात पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये देखील पाऊस पडेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे