[Marathi] बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पाऊस

September 3, 2019 3:46 PM | Skymet Weather Team

वायव्य बंगालच्या उपसागरावर व त्यालगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेले सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम बंगालच्या उपसागर व लगतच्या ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर स्थित आहे.

हवामान प्रणालींबद्दल बोलायचे झाल्यास, एक चक्रवाती परिभ्रमण वायव्य मध्य प्रदेश तर दुसरे चक्रवाती परिभ्रमण पूर्व मध्य प्रदेशवर आहे. मान्सून ट्रफ चा अक्ष उत्तर-पश्चिम राजस्थान पासून उत्तर मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल मधून बंगालच्या उत्तर खाडी पर्यंत विस्तारलेला आहे आणि कमी दाबाचा पट्टा या प्रणालींना जोडत आहे. यामुळे देशातील केवळ मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय राहिला असून त्याची हालचालही संथ झाली आहे.

हे कमी दाबाचे क्षेत्र अंतर्गत भागात पोहोचल्यावर ट्रफ रेषेत विलीन होईल. ही प्रणाली वायव्य दिशेने सरकण्याची अपेक्षा असून त्यामुळे येत्या २४ तासांत छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश हे भाग व्यापण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या कक्षेत येणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यात पावसाची शक्यता आहे. आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्र या दक्षिणेकडील भागांतही या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

या पूर्वीच्या प्रणालीच्या तुलनेत ही प्रणाली अधिक मजबूत आहे. म्हणजेच हि प्रणाली तीव्रता आणि व्यापणाऱ्या क्षेत्राच्या बाबतीत मजबूत असून विस्तृत क्षेत्र व्यापणे अपेक्षित आहे. आमच्या हवामानतज्ञांनी आधीच नमूद केले आहे की जेव्हा ही प्रणाली अंतर्गत भागांत सरकेल तेव्हा पश्चिम किनाऱ्यावरील गतिविधी सक्रिय होतील. जरी पूर्ण किनारा नाही तरी किनाऱ्याच्या काही भागांमध्ये गतिविधी सक्रिय होतील. गेल्या २४ तासांत कोकण आणि गोव्यात आधीच चांगला पाऊस झाला असून पुढील २४ तासांत देखील कोकण आणि गोव्यातील काही भागात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

पुढील २४ तासांत रत्नागिरी, मुंबई, डहाणू, हर्णे, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Credits – CNN.com

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES