बंगालच्या खाडीमध्ये बनलेला कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे. स्कायमेटने आधीच वर्तविल्यानुसार, ही प्रणाली आता आंशिकपणे जमिनीवर आहे आणि अंशत: समुद्रापर्यंत बंगालच्या उत्तरपूर्व खाडीच्या बाजूला ओडिसाच्या किनाऱ्याकडे आहे. पूर्व किनाऱ्यावर देखील एक ट्रफ विस्तारत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे ओडिसा, झारखंड, तेलंगाणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह तामिळनाडुमध्ये पाऊस झालेला आहे.
मागील २४ तासांत गोपाळपूरमध्ये ७२ मिमी पावसाची नोंद झाली. रेंताचिंताला येथे ६४ मिमी, रामागुंडम ६६ मिमी, जगदलपूर ५५ मिमी, जमशेदपूर ४८ मिमी, कोरापुट ४७ मिमी, अंगुल ४५ मिमी, बारीपाडा ४५ मिमी, केंजरगढ ३६ मिमी, चेन्नई २९ मिमी, चांदबाली २७ मिमी, आणि भुवनेश्वर येथे २४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
आता ही यंत्रणा जमिनीकडे अंतर्गत भागात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील भाग, पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पुढील २४ तासांत बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत, ही प्रणाली अजून आत जाईल ज्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस व किनारी कर्नाटकवर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ जून रोजी रत्नागिरी, मुंबई, डहाणू, महाबळेश्वर या शहरांमध्ये पावसाचा जोर वाढेल. २३ जून नंतर देखील कोकण आणि गोव्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहील.
ह्या प्रणालीच्या प्रभावामुळे मान्सून पूर्व, पश्चिम किनारीवरील काही भाग आणि दक्षिणी द्वीपकल्पावर प्रगती करेल. सुस्तावलेले मान्सून आता प्रगती करेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे