दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र मागील 24 तासांत आपली ताकद टिकवून आहे. सध्या हे क्षेत्र स्थिर असून मेघ संरचना आणि वातावरणीय परिस्थिती हि प्रणाली अधिक विकसित होण्याकडे निर्देश करीत आहेत. हवामानतज्ञांच्या अनुसार, पुढील २४ ते ३६ तासांदरम्यान ही प्रणाली डिप्रेशन मध्ये रूपांतरित होऊ शकते.
मान्सूनच्या आगमनानंतर केरळवर मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी जोरदार पावसाला ही प्रणाली जबाबदार आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत अलापूझामध्ये ६६ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल तिरुवनंतपुरम ३२ मिमी, वैकोम २४ मिमी, कोची २३ मिमी, मुन्नार २२ मिमी आणि पुनालूर येथे १२ मिमी इतका पाऊस झाला.
खरं तर, लक्षद्वीपमध्येही चांगला पाऊस नोंदला गेला, अगाथी येथे ५६ मिमी पाऊस झाला, मिनिकॉय १० मिमी आणि अमिनी येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली. काही वेळेपर्यंत हि हवामान प्रणाली स्थिर राहण्याची अपेक्षा असून, त्यामुळे केरळमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल व पावसाचा जोर २४ तासांनंतर कमी होईल.
हवामानतज्ञांच्या मते, मेघ संरचना अधिक संघटित होण्यास सुरुवात होईल तेव्हा, हि प्रणाली मार्गक्रमण करेल. या संभाव्य चक्रीवादळाचे स्वरूप गेल्यावर्षीच्या चक्रीवादळ मेकुनू सारखेच आहे. मेकुनुंनी मान्सूनच्या प्रगतीस अडथळा आणला आणि आगमनाला देखील विलंब केला. हि प्रणाली देखील जूनमध्ये सारख्याच परिस्थितीत तयार झाली होती.
मेकुनू आणि संभाव्य चक्रीवादळ यांच्यामध्ये एकच फरक आहे. मेकुनू पश्चिमेकडे सोमाली व ओमान किनारपट्टीकडे वळले होते, मात्र संभाव्य चक्रीवादळ उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने बहुतेक कराची, पाकिस्तानकडे जाणारे आहे.
Updated on June 8, 2019 3 PM: मान्सूनच्या आगमनासाठी कारण असलेली दक्षिणपूर्व अरबी समुद्रावरील चक्रवाती प्रणाली गेल्या २४ तासांत अधिक संघटित झाली आहे. ज्यामुळे दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रावर एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे.
स्कायमेटनुसार, कमी दाबाचे क्षेत्र अनुकूल वातावरणात प्रवास करत आहे उदा. खुला समुद्र, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस आणि वरच्या दिशेने कमी असलेली वाऱ्यांची भिन्नता. अशा प्रकारे, पुढील २४ तासांत हि प्रणाली अधिक चांगल्या संघटित कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित होण्याची अपेक्षा करू शकतो. किंबहुना, ह्या प्रणालीत चक्रीवादळ किंवा तीव्र चक्रीवादळांमध्ये रूपांतरित होण्याची पूर्ण क्षमता आहे. तथापि, यावर भाष्य करणे उतावीळ पानाचे होईल, त्यामुळे आपल्याला ह्या प्रणालीच्या पुढील वाटचालीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
ही प्रणाली पुरेशे अंतर राखून ठेवत पश्चिम किनारपट्टीशी समांतर उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. हवामानतज्ञांच्या अनुसार, ही प्रणाली किनारी भागांसाठी धोकादायक नाही परंतु केरळपासून कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ९ जून नंतर पाऊस आणि जोरदार वाऱ्यासाठी कारणीभूत असेल.
मुंबईतील पावसाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील ही यंत्रणा जबाबदार असेल. मुंबईत ११ किंवा १२ जून रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हि प्रणाली सौराष्ट्रच्या किनारी भागाला धोका ठरू शकते परंतु ती भारतीय किनारपट्टीत प्रवेश करणार नसून कराची किनारपट्टीजवळून पाकिस्तानकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. हि प्रणाली उत्तर अरबी समुद्रात प्रवेश करणार असल्यामुळे थंड पाणी आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घटत यामुळे तिची तीव्रता थोडी कमी होईल.
चक्रीवादळ तयार झाल्यास, हंगामातील तिसरे आणि अरबी समुद्रातील पहिले चक्रीवादळ असेल. त्याला चक्रीवादळ 'वायू' असे नाव दिले जाईल. यापूर्वी, चक्रीवादळ फोनी बंगालच्या खाडीत विकसित झाले होते आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले होते. मान्सून हंगामादरम्यान चक्रीवादळ तयार होणे ही एक दुर्मिळ शक्यता आहे परंतु मान्सूनच्या कमकुवत लाटेमुळे वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते.
अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळ आणि मान्सूनवर त्याचा प्रभाव
एकीकडे ह्या हवामान प्रणालीमुळे केरळ मान्सूनचे आगमन झाले परंतु हीच प्रणाली मान्सूनच्या संथ प्रवासाला देखील कारणीभूत आहे.
कमी दाबाचे क्षेत्र अधिक चिन्हांकित होत असल्याने, आर्द्र वारे ह्या प्रणालीकडे आकृष्ट होतील. यामुळे किनारीभागातील पावसात लक्षणीय घट होईल. तथापि, केरळ, कर्नाटकच्या किनारी भागात तसेच कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर पाऊस पडेल, परंतु मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी फायदेकारक नसेल
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे