Skymet weather

[Marathi] बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सून सक्रिय, परतीचा प्रवास ऑक्टोबर पर्यंत लांबला

September 28, 2019 10:52 AM |

Monsoon in India

मान्सूनच्या हंगामात पाऊस पडण्यासाठी कमी-दाबाचे क्षेत्र एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी ते तयार आहेत. सामान्यतः सप्टेंबरच्या शेवटी या यंत्रणेची वारंवारता कमी होते. तथापि, या वेळी अशी परिस्थिती नाही.

उदाहरणार्थ, नुकतेच अरबी समुद्रात झालेले चक्रीवादळ हिक्का आता विलीन झाले आहे. महाराष्ट्राची दक्षिण किनारपट्टी आणि गोवा-कर्नाटक आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात असलेले चक्रीय परिभ्रमण आता कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असून सद्य स्थितीत अरबी समुद्रात गुजरात आणि कोकण किनारपट्टीलगत आहे.

ह्या प्रणाली संघटित होत असून आणि एक संघटित चक्रीय परिभ्रमण मदत करत आहे ज्यामुळे गुजरात, कोकण आणि सौराष्ट्रात यापूर्वीही बऱ्याच ठिकाणी तुरळक मुसळधार सरींसह पावसाळी गतिविधी नोंदल्या गेल्या आहेत.

ही प्रणाली चिन्हांकित कमी-दाबाचे क्षेत्र म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या ४८ तासांत, विशेषत: पुढचे तीन दिवस गुजरातमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आग्नेय राजस्थान, कोकण विभाग आणि नैऋत्य मध्य प्रदेशात काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आपण असे म्हणू शकतो की या भागात ३० सप्टेंबरपर्यंत तुरळक जोरदार सरींसह पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर पाऊस ओसरण्यास सुरवात होईल.

या गतिविधी मान्सूनच्या परतीस नक्कीच अडथळा आणत असून परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणार असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

अरबी समुद्रात ही हवामान प्रणाली कायम राहिल्यास, २८ सप्टेंबरच्या सुमारास उत्तर-बंगालच्या उपसागर आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच्या ४८ तासांत ते अधिक चिन्हांकित होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक कमी दाबाचे क्षेत्र

सध्या, कमी दाबाचा पट्टा पश्चिम उत्तर प्रदेशपासून बिहारमार्गे हिमालयीन पश्चिम बंगालपर्यंत विस्तारत आहे. उत्तर बंगालच्या उपसागरामध्येही चक्रवाती परिभ्रमण आहे जे पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित होईल. या प्रणालीला देखील चिन्हांकित परिभ्रमणाची मदत मिळत आहे. सामान्यत: या काळात, प्रणाली वायव्य दिशेने प्रवास करीत नाहीत आणि त्या दिशा बदलतात, जे परतीची प्रक्रिया देखील ठरवते.

कमी-दाबाच्या क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर प्रभावित क्षेत्र

ही प्रणाली बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि बांगलादेशच्या जवळपास असल्याने या भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशसह ईशान्य भारतामध्ये काही ठिकाणी जोरदार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या संपूर्ण पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची तूट आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या पावसासह संभाव्य आगामी प्रणाली तूट कमी करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

मान्सूनचा हंगाम ३० सप्टेंबर रोजी संपेल आणि या तारखेनंतर होणाऱ्या पावसाळी गतिविधी मान्सून हंगामात मोजल्या जाणार नाही. तथापि, या पावसामुळे तूट असलेल्या प्रदेशांना काहीसा दिलासा मिळू शकेल.

Image Credits – The Hindu Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try