चीन जवळ निर्माण झालेल्या सोडेलोर या प्रचंड चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात इतके दिवस काहीच हवामान प्रणाली तयार झाली नाही. आणि नेहिमी याच काळात नवीन हवामान प्रणाली तयार होत असतात. पण या चक्रीवादळामुळे तसा बंगालचा उपसागर निष्क्रिय होता.
आता मात्र या चक्रीवादळाची क्षमताहि कमी झाली असून ते आता चीनच्या दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आता परिस्थिती साधारण होईल असा अंदाज आहे.
याच दरम्यान दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती अभिसरणाची प्रणाली तयार झाली आहे. या हवामान प्रणालीला प्रभावी बनण्यास साधारणतः ४८ तास लागतील असे अपेक्षित आहे.
तोपर्यंत या प्रणालीमुळे सागरातच थोडासा पाऊस होईल आणि ती थोडीशी किनारपट्टीजवळ सरकेल. आणि त्यानंतर मात्र या प्रणालीचे रुपांतर कमी दाबाच्याक्षेत्रात होऊन ते जमिनीकडे सरकेल. यामुळे भारताच्या मध्य भागात म्हणजेच ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या भागात पाऊस होईल.
या हवामान प्रणालीला किनारपट्टीपासून महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पोहचण्यासाठी २ ते ३ दिवस लागतीलच. या प्रणालीमुळे केरळातील मान्सून देखील प्रभावी होईल.
सध्या सर्वात जास्त पावसाची कमतरता असलेले भाग म्हणजे विदर्भ, मराठवाडा, रायलसीमा, तेलंगाणा आणि उत्तर कर्नाटकातील आतील भाग. या भागातील पावसाची कमतरता पुढील प्रमाणे आहे मराठवाडा ५२%, उत्तर कर्नाटकातील आतील भाग ४५%, रायलसीमा ३५% आणि तेलंगाणा २७%.
येत्या हवामान प्रणालीमुळे याभागात थोडा पाऊस होईल आणि पावसाची उणीव कमी करण्यासही मदत होईल. पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार मध्ये येत्या ४८ ते ७२ तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे.
Image Credits: economictimes.indiatimes.com