[Marathi] मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर तुरळक पाऊस , किनारी भागात उबदार आणि आर्द्र वारे

October 26, 2018 5:10 PM | Skymet Weather Team

गेल्या 24 तासांत, कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर तुरळक पाऊसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहर परिसरात देखील हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र ,विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामानात कोणताही बदल झालेला नसून या भागांमध्ये अजूनही कोरडे हवामान अनुभवण्यात येत आहे.

तथापि एक ट्रफ रेषा तमिळनाडुपासून उत्तर महाराष्ट्रा पर्यंत विस्तारलेली असल्यामुळे कोकण-गोवा तसेच आसपासच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर थोडा काळ पाऊस होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे , किनारी भागात उबदार आणि आर्द्र वारे अनुभवण्यात येत असून दिवसाचे तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे व किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे .

त्याचप्रमाणे, मुंबईकर देखील उकाडा सहन करत असून, तापमान 37 अंशापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान येणाऱ्या दिवसात वातावरणात बदल नसून तापमान आणखी वाढणे अपेक्षित आहे .

Image Credits –TravelTriangle

Any information taken from here should be credited to Skymet Weather

 

 

 

OTHER LATEST STORIES